पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

विमान

(३)   विमान


आई, मला नक्को हे खेळण्यातलं विमान

खर्ऱ्या खुर्ऱ्या विमानात बसेल म्हणतो छान ||धृ.||


वैमानिक काकांशी मी, लाडीगोडी लावेन

विमानात काॅकपिटमध्ये, जाऊन बसेन

मित्रांना सांगेन ऐटीत, वाढेल माझी शान ||१||


हवाई सुंदऱ्यांना करेन, मी थोडीशी मदत

विमानात चालून चालून, असतील त्या दमत 

जमिनीवर चालतांना त्यांना, येतो का गं ताण? ||२||


जमिनीवरील पाहीन मी, दिवे लुकलुकणारे

आकाशातील दिसतील जवळून, तारे चमचमणारे

काय पाहू, किती पाहू, हरपेल माझं भान ||३||


घाबरू नकोस बिलकुल आई, मी लवकरच येईन

तुझ्यासाठी खूप खूप खाऊ, आणि खेळणी आणीन

मात्र तुझ्या कुशीतच झोपेन, मी होऊन लहान ||४||


भारती महाजन-रायबागकर

चेन्नई

9763204334

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू