पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

बडबड गीत - पाऊस

गार गार वारे झर झर वाहती

ढग तर सारे गड गड करती 

पाऊस थेंबे धो धो पडती 

सुवास मातीचा धरणी वरती ......(१)


पक्षी सारे किलबिल करती

बेडूक मामा टर टर करती

छत्र्या सारे पट पट उघडती

मित्र तर माझे पावसात भिजती.....(२)


जमले तळेच शाळे भोवती

पटांगणी आमच्या आली भरती 

लवकर शाळेस सुट्टी मिळती

थोडाच गृहपाठ डोक्यावरती.....(३)


करुनी छप छप पाण्या वरती

घड्या सप सप कागदा घालती 

होड्या झर झर बनुनी पळती 

वाट काढत दूर दूर जाती......(४)





पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू