पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

डॉक्टरांना आठवतांना

नीलिमा रवि
17 डिसेंबर डॉ.लागूंचा स्मृतीदिन त्यानिमित्त

डॉक्टरांना आठवताना!

तो होता एक सम्राट
थोड्या मोकळ्या जागेच्या
रंगमंचाचा

चित्रचौकटीच्या अवकाशात
त्याने विचारलं होतं -
मारुती कांबळेचं काय झालं?
तो येरागबाळा मास्तर
पिच्छा सोडतच नव्हता प्रश्नाचा...

तो होता श्रीराम बुद्धीवादी
तो होता कट्टर विज्ञानवादी
तो होता हिमालय सावलीचा

तो होता सूर्य पाहिलेला माणूस
तो पुरस्कर्ता देवाच्या रिटायर्डमेंटचा
पण तो होता शोधत देवत्व माणसांत
धडपडणाऱ्या मानवतावाद्यांत
होता पाईक सामाजिक कृतज्ञतानिधींचा

तो होता तरी नव्हता डॉक्टर
म्हणवत होता फक्त लमाण
लेखकाचे शब्द जाणीवा वहाणारा,
जो होता उत्तुंग नटसम्राट

पिच्छा पुरवायला आता नाही मास्तर
तो पिच्छा पुरवणारा प्रतिध्वनी
येत राहिल न मुखामुखातून
डॉक्टरांना आठवताना!

नीलिमा रवि
17 डिसेंबर डॉ.लागूंचा स्मृतीदिन... त्यानिमित्त

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू