आईचा प्रश्न
सांगाल का कोणी सोप्पी राय
शाळेच्या डब्ब्यात द्यावं काय?
चवळीची शेंग,कोबीची भाजी
लाडकं बाळ होईल का राजी?
शेवगा, हादगा, पालक, मेथी
बाळ म्हणतंय नेहमीच देती
टमाटा, बटाटा, कारलं कडू
पाहून बाळाला येतंय रडू
लोणचं, दही, टमाटा, सॉस
बाळाला येतोय आंबट वास
श्रीखंड, पुरी, गाजराचा हलवा
गडबडा लोळून करतंय कालवा
पिझ्झा, बर्गर, मॅगी नि पाव
डब्ब्यात पाहून खुलतात राव
फास्टफूड खाऊन कुणाचं भलं?
टोकाचा आग्रह करतात मुलं
-भानुदास धोत्रे
परभणी
7972625086