आजोबांचे ट्युशन.........!!
लाडीगोडी लावीत नातू , बोले आजोबाला
मोबाईल कधी घेणार सांगा, स्क्रीनटचवाला
नातवाचा प्रश्न ऐकून, मनामध्ये बावरले
हॅण्डल कसं करू म्हणे , वय माझे सरले
फिकीर नका करू म्हणे, मला सारे गावते
त्याच्याआतले फंक्शन सारे, बोटासरशी धावते
नातवाने देता हमी, विचार पक्का झाला
पेन्शच्या पगारीवर, मोबाईल घरात आला
नातू आता रोज घेतो, आजोबांचे ट्युशन
आजोबाला सांगतो समजून, नवे नवे ऍप्लिकेशन
आजोबाही मन लावून, धडे गिरवीत असतात
हातामध्ये मोबाईल घेऊन, गुलुगुलु हसतात.
-भानुदास धोत्रे
परभणी
7972625086