पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

हुर्यो हुप्पा....!!

संपल्या बाई दिवाळ सुट्टया

लुटूपुटीची भांडणे कट्ट्या

भाचे म्हणूनी खाल्ला भावं 

जवळ करूया आपला गावं


हळवा मामा होईल भावुक

खोडकर भाचे त्याला ठाऊक

बळेच खिशात टाकील नोट

गालाला तो लावील ओठ...


विसरून जाऊन सारे क्षणभर

मिञ मैत्रिणी म्हणतील बाय

ठेऊ न मनात वैर आम्हीही 

त्यांना करुनी हॅल्लो हाय...


गल्ली गल्ली नि चप्पा चप्पा

ध्यानात ठेऊनि गोष्टी गप्पा

चला गाठू या पुढचा टप्पा

सुट्टया संपल्या, हुर्यो हुप्पा, हुर्यो हुप्पा..!!


             -भानुदास धोत्रे

              परभणी

              7972625086






























पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू