पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

गुगलदादा झूमदादा

 गुगल दादा झूम दादा
 खूप तुमचे आभार
 तुम्ही दिला आम्हा
 ऑनलाइन चा आधार||1||

 सगळेच होते बंद
 शिक्षण ऑनलाईन
 आम्हीही मंग झालो
 मीटिंगमध्ये जॉईन|2||

 मॅडम आणि सर
 स्क्रीन वरती आले
 त्यांना पाहून आमचे
 मन प्रसन्न झाले||3||

 हळूहळू विषयाचा
 रंगू लागला तास
 तयार होऊन आम्ही
 बसू लागलो खास||4||

 मीटिंग जॉईन करता
 शाळा भरली मोठी
 स्क्रीन माईक ऍडमिट
 शब्द आले ओठी||5||

 गजबजलेल्या वर्गाची
 सर नाही येणार
 तरीही तुमचे महत्त्व
 कमी नाही होणार||6||

कवी प्रदीप कासुर्डे
घणसोली नवी मुंबई
 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू