चांदोमामा-चांदोमामा
शाॅपिजन : "किलबिल "
बालकाव्य स्पर्धेसाठी
कविता 1/3
*चांदोमामा -- चांदोमामा
( बालगित )*
चांदोमामा चांदोमामा
म्हणतात तुला सारे
मात्र कधिच येत नाहीस
भाऊबिजेला कां रे ....॥१॥
आई पण म्हणते
चंदा माझा भाऊ
कां रे कधी येत नाहीस ?
घेऊन मला खाऊ ! ...॥२॥
दिवसा किती शोधतो मी
दिसत नाहीस कुठे
रात्री मी झोपल्यावर
पळुन जातोस कुठे ?.॥३॥
तुप- रोटी खायला
रोज बोलाविते आई
लांबुनच टाटा करून
जायची तुला घाई ॥४॥
एवढुसा दिसता दिसता
होतोस चेंडु एवढा
सांगशिल कां तुझी आयडिया
मी पण होईन झटकन मोठा ॥५ ॥
नसेल तुला येता येत
अंगणात माझ्या ऊतरून
मीच येइन तुझ्याकडे
एकदा यानात बसुन ..॥६॥
...... प्रदिप राजे
रोहा _ पुणे
मो.नं.९४२२०९४८५४
९६६५४९७७०७