विठू विठू पोपट
शाॅपिजन: " किलबिल :
बालकाव्य स्पर्धेसाठी
कविता : तिसरी ३/३
*खारूताई -- माझी नविन दोस्त*
झाडावरच्या चिंगुली खारूताई
येतेस कां माझ्याशी खेळायला
अभ्यास नाही नि होमवर्क नाही
सुट्टी आहे आता माझ्या स्कुलला II १॥
ह्या फांदीवरून त्या फांदिवर
सरसर सरसर धावतेस कशी
उंचावरून उडया मारताना
भिती बिलकुल वाटत नाही कशी ॥२॥
तुझ्यासारखं चढायला झाडावर
शिकवशील जर मला
माझ्या बुकातील पोएम आणि स्टोरी
शिकविन मी तुला ॥ ३॥
तुझ्या सगळ्या फ्रेंड्स्ना घेऊन
येशिल कां माझ्या घरी ?
कार्टुन नेटवर्क बघुन
करू आईस्लीम पार्टी ॥४॥
आबांचा मोबाईल फोन घेऊन
काढु एक सेल्फी मस्त
स्कुलमधल्या फ्रेंडस्ना सांगिन
ही बघा माझी नविन दोस्त ! ॥५॥
......... प्रदिप राजे
रोहा-पुणे
मो.नं. ९४२२०९४८५४
९६६५४९७७०७