पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

फास...

गळ्याला फास तू

लावलास खरा

पण अजून झाला नाही

तुझा सातबारा कोरा


खिन्न झाले शिवार

सुन्न झाले वारे

जमिनीला पडल्या भेगा

काळजाला पडले चरे

शेतकरी बचावचा बघ

गुंजेल आता नारा ।।


जगाला जगवायचे 

व्रत होते तुझे

आज मात्र अंगणात

प्रेत सजले तुझे

तू निसटला गड्या पण

कर्जभार कुटुंबांवर सारा ।।


जीवनात सुखदुःखाचे

येत राहतात वारे

फक्त एका फासाने 

प्रश्न सुटतात का रे सारे ?

मुक्या जित्राबांनी कोणाकडे

आता मागायचा चारा ।।


फक्त दोन एकराचा

सातबारा होता तुझा

तरी सात फेरे घेऊन तुला

तिने मानले होते राजा

पण तुझ्याविना तिचा

आज दरबार सुना सारा ।।


तुझी दोन पोरे बघ

पाहतात तुझ्याकडे

सुखी संसाराला कसे

गेलेत बघ तडे

बायको तुझी पाहतेय

तुझा न्याहाळून चेहरा ।।


कोरड्या भावनांचे आता

सरकार जागे होईल

कधी नव्हे ते रोज तुझ्या

दारामध्ये येईल

तुझ्या राखेवर कर्जमाफीचा

पुन्हा पेटवतील निखारा ।।


श्री. संदिप पंडित

९६५७८२८६८७




पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू