पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

पोपट

 

एकदा एका चिंगीने आणला पोपट
दिली त्याला पेरूची फोड
पिंजरा आणला बोलक्या मित्रासाठी
मिरची देखील लागली गोड

"नमस्कार" बोलली चिंगी
पोपट म्हणाला, "नमस्कार"
आनंदाने उड्या मारत बोलली
देईन तुला मी छोटी कार

सेल्फी काढला पोपटासोबत
मैत्रिणीने केले स्वागत
शाळेत जमल्या सर्व सखी
पोपट पुराण होते मुखी

चित्रकलेचे शिक्षक आले
"पोपटाचे चित्र काढा" म्हणाले
पानाफुलात पोपट सजला
चिंगीचा नंबर पहिला आला

एक दिवस अचानक
चिंगी गेली सहलीसाठी
काय झाले कुणास ठाऊक
पोपट उडाला नदीच्या काठी

रडून रडून डोळे सुजले
चिंगी ने जेवण सोडले
आई बोलली दुर गेला पक्षी आपला
छंद लागला जीवापाड जपला

प्रज्ञा हंसराज बागुल
कसारा ठाणे

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू