पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

विझत आलेले दिवे

विझत आलेले दिवे. कुठे बरे असतात हे दिवे ?सर्वत्र असतात . तुमचे लक्ष जात नाही कारण तुम्ही स्वत:च्या कामात व्यस्त असता त्यामुळे तुम्हाला हे तेजोहीन दिवे दिसत नाहीत.
                          हे दिवे सायंकाळी जागोजागी दिसतात. सार्वजनिक बगिच्यांमध्ये, रस्त्याच्या कडेला असलेल्या कट्टयावर किंवा एखाद्या देवालयात व सकाळी दहा वाजल्यानंतर बॅंकेत नाहीतर एखाद्या सरकारी कार्यालयात. उर्वरित आयुष्याचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करत असतात.
                           आजूबाजूचे लोक त्यांची दखल घेत नाहीत. अनाकर्षक व क्षीण प्रकाशात तेवणाऱ्या दिव्यांकडे कोण बघणार?
                            तरीपण हे विझत आलेले दिवे सर्व ठिकाणी वावरत असतात. त्यांचे आयुष्य नगण्य असूनही.
                          एक वेळ होती जेव्हा हे दिवे तेजस्वी प्रकाशाने चमकत होते. त्यांच्या तेजस्वी प्रकाशाचा आधार घेऊन अनेकांनी त्यांच्या भावी आयुष्याचा पाया रचला व ते दूरदूर निघून गेले. विझत आलेल्या दिव्यांचा त्यांना विसर पडला.
                           एक वेळ होती जेव्हा या दिव्यांनी आपल्या तेजस्वी प्रकाशाच्या मदतीने स्वत:च्या आयुष्यात सुंदर, विविध रंग भरले होते. बरोबरच्या दिव्यांच्या संगतीत सहवासाचे सुंदर क्षण वेचले होते. पण काही दिवे विझून गेले व काही अजून क्षीण प्रकाशात तेवत आहेत.
                             दिव्यांचा प्रकाश क्षीण होत गेला. तरीपण त्यांचे अस्तित्व मिटेना. दुर्बल होऊन विझत आलेले दिवे तसेच आयुष्याचा मार्ग काटत राहिले.
                             पूर्वी हे विझत आलेले दिवे आतासारखे मोठ्या संख्येने दिसत नसत कारण त्यांची ज्योत निस्तेज व्हायच्या अगोदरच ते विझून जात.
                               काय बदल झाला ते कळत नाही पण आजकालचे दिवे विझता विझत नाहीत.
                                क्षीण प्रकाशात नगण्य अस्तित्वाचे आयुष्य घेऊन  ते अंतिम क्षणाची प्रतीक्षा करत आहेत.
                         लेखिका ——- नीला प्रधान 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू