पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

तुला स्मरतांना

तुला स्मरतांना....



स्वतः स्वतःला भेटलीच नाही कधी

सगळं मिळालं आयुष्यातील सुख

दुःख ही सोसले वेळोवेळी....

आलेल्या संकटांना मागे फिरविण्याचा

प्रयत्न केला....काही फिरली 

उभी आहेत अजून काही!

तिकडे लक्ष न देता आनंद घेते आहे

जीवन जगण्याचा... चिल्यापिल्यांसाठी....

चालावे तर लागेलच कारण

दुसरा पर्याय नसल्यामुळे...

थोडे स्थिरावले तेव्हा तुझी आठवण झाली...

आतापर्यंत पळता पळता तू वाटेत

दिसलाच नाही की मी पाहिले नाही!

चुकलंच माझं. पण ऐक ना!

आता एकच मागणं मागते मी

दे ना शक्ती तुझं नाम घेण्याची..

वाढव माझं आत्मबळ तुला स्मरण्यासाठी

अंतरंग कळू दे तुला स्मरतांना...

कठीण आहे मान्य आहे पण

प्रयत्न तर करून बघते....

मी पण अर्जुन च आहे.....


रसिका राजीव हिंगे


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू