पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

चाळीशी - आत्ताची

भारूड 


    *चाळिशी…. आत्ताची*


स्त्री- आली आली गं चाळिशी बाई

माझी चाळीशी आली गं बाई….हो…


कोरस- चाळीशी आली व्हय? मंग         आता मोकळी झालीस की तू…


स्त्री- मोकळी?...

आत्ताशी तीन वर्षाचंच आहे पहिलं मुल

आणि सिझरींगमुळे दुसऱ्याची नको एवढ्यात चाहूल

आत्ताच कंबरदुखी, पाठदुखी आल्यात सोबतीला

तरी बाई ठेवलीय सगळ्याच कामांना

अजून तर मी डायपर, दुधाची बाटली सांभाळते बाई…

माझी चाळीशी आली गं बाई….हो…


कोरस- आत्ताच नको दुसरं? तर मंग कवा, म्हातारी झाल्यावर? आधीच तर उशीर झालाय…


स्त्री- अपेक्षा पूर्ण करणारा नवरा मिळेपर्यंत उलटते तिशी

आणि नंतर ब्राईट करिअर करण्यासाठी होते कासाविशी

करिअरमध्ये अडचण नको म्हणून करत नाही मुलाचा विचार

आणि नंतर व्हावं म्हणून करावे लागतात उपचार

मग एकालाच सांभाळतांना दमछाक होते गं बाई

माझी चाळिशी आली ग बाई…हो


कोरस - अगंगंंगं! म्हणजे घोडनवरीच की…त्येचात कामाची सवय नाही…मंग लेकरामांगं धावतांना दमणारच…आमच्या वेळेस…


स्त्री- तुमच्या वेळेस पन्नाशीतच आजी व्हायची बाई

कारण विशीच्या आतच लग्न करायची तिच्या पालकांची घाई

लवकर मुलं झालीत तर आनंदच सगळ्यांना

घरातले सर्वच असती राजी तिची मुलं सांभाळण्या

आता एकटीलाच दशभुजा व्हावं लागतंय बाई

माझी चाळिशी आली गं बाई…हो…


कोरस - व्हावंच लागणार दशभुजा…पैसा पायजे नव्हं? मग त्येच्या खर्चाला बी धा वाटा फुटायच्याच…


स्त्री- शाळेची फी, पार्ट्या, दोन दोन घरं

स्टेटस् प्रमाणे आम्हाला राहावं लागतंय बरं

हे वय असतं म्हणे रसाळ आणि मधुर

इथं जेवायला सुध्दा वेळ मिळणं खूपच दूर 

स्वतःकडे बघायला फुरसत कुठून आणू बाई

माझी चाळिशी आली गं बाई…हो…


भारती महाजन-रायबागकर

चेन्नई

9763204334

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू