पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

लुडो खेळ

     लुडो खेळ


लुडो मध्ये झाले सर्व गुडू

खेळात  लागले बुडू 

कुणाच्या चेहऱ्यावर हसू

तर कुणाच्या दुःखी

तीन गेले एक आले

जीवन झाले सुखी


खेळात खेळ चांगला

वेळात वेळ ही जातो

पूर्वीच्या चांफूलचा खेळ

आता मोबाईल वर येतो


चार जण खुशीत

मोबाईलवर खेळतात

तीन जण दुःखी तर

एक जण हसतो


कधी एक तर कधी सहा

एकदाचं घरे पडतात

दोन तीन चार पाच ने

पुढे पुढे गोट्या सरकतात


गोट्या सेव्ह करण्यासाठी

कट्टा धरन्यास धडपडतात

हळूच गोटीला गोटी मारून

दुःखी मनाने स्वगृही परतात


खेळ रंगात येत असताना 

एक एक गोटी विजयी ठरते

मनोरंजनाच्या खेळातून मात्र

रुपयाची देवाण घेवाण होते



    शब्दांकन

पांडुरंग  कोकुलवार

       नांदेड 





पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू