पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

कोण आहेत शत्रू राष्ट्र भाषेचे ?

- कोण  आहे शत्रू राष्ट्रभाषेचे  ?
------------------------------------
- लेख - विश्वनाथ शिरढोणकर , इंदूर , 
----------------------------


- तामिळनाडू राज्यात हिंदी भाषेसाठी असंवेदनशीलता बघायला मिळते व आपल्याला असाच प्रत्यक्ष अनभुव देखील येतो .तामिळनाडू राज्यात त्यांच्या माय भाषेबद्दल प्रचंड कौतुकास्पद सन्मान व आपुलकी आढळून येते  .हिंदी या  राष्ट्रभाषेबद्दल  तामिळनाडूच्या जनतेशी आणि राज्यकर्त्यांशी इतर भारतीयांचा बराच मतभेद असला तरी एक राष्ट्रप्रेमी म्हणून आपण या बाबतीत नक्कीच समाधानी असू शकतो की एका राज्याच्या भाषेला ( तमिळ ) , संस्कृतीला आणि  अस्मितेला  जपण्यासाठी त्या राज्यांचे सर्व नागरिक अपार जोमाने कार्यरत असून ते  भावनिक रित्या मायबोलीशी जुळलेले आहे . पण राष्ट्रभाषेचे काय ? कारण भाषाप्रेम व राष्ट्रप्रेम या भावना परस्पर विरोधी नाही . एकाच ईश्वरची आराधना लोकं वेगवेगळ्या भाषेत करतात . अर्थातच भावना आपआपल्या  भाषेत मोकळेपणाने व्यक्त करता येते . 
- तामिळनाडू राज्य हे एक उदाहरण आहे . दक्षिणातले सर्वच  राज्य भाषेसाठी थोडे जास्त संवेदनशील 
आहेत . महाराष्ट्रात देखील अनेक राजकारणी हिंदी भाषेला राष्ट्रभाषा मानत नाही . ते या भाषेला संपर्क भाषा देखील मानायला तयार नाही . पण गेल्या ५० वर्षात मुंबई , पुणे , नाशिक , औरंगाबाद सकट अनेक शहरात मराठी भाषिकांची संख्या जास्त प्रमाणत  घसरत चालली आहे . अर्थात भाषेचे संकट हिंदी  भाषा सकट क्षेत्रीय भाषांवर देखील आलेले आहे . 
- पण हिंदी भाषिक क्षेत्रात ( राज्यात ) राष्ट्रभाषा हिंदीचे भवितव्य काय आहे ? भाषा प्रमाणे प्रत्येक राज्याच्या क्षेत्रीय भाषा वगळल्या तर २००१ च्या लोकसंख्ये प्रमाणे हिंदी भाषिक राज्यांची लोकसंख्या 
७५ कोटी पेक्षा जास्त आहे आणि २०११ च्या लोकसंख्ये प्रमाणे ही संख्या ८०  कोटी पेक्षा जास्त 
असेल . भारताचे एकूण क्षेत्रफळ ३१,६६,२०५ वर्ग किलोमीटर पैकी ८०  टक्के क्षेत्रात हिंदी  भाषिक राहतात . या ८० टक्के क्षेत्रात राहणाऱ्या ८० कोटी हिंदी भाषिक लोकांच्या हिंदी भाषेला जाणीव पूर्वक संपविण्याचे कटकारस्थान देशाला स्वातंत्र्य मिळाल्या पासूनच  सुरुच  आहे . गेल्या २५ वर्षात या कटकारस्थांना फार जोर आलेला आहे . मोठे उद्योजक , व्यवसायी , नोकरशाह , आणि राजकारणी लोकांचा या कटकारस्थानात  आपआपला  स्वार्थ आहे . गर्वानं असं म्हटलं जातं की भाषा कधी मरत नाही , पण हिंदी भाषेसाठी असं म्हटलं जातं की , ' हिंदी के दिन चार . '  
-असं म्हटलं जातं की भाषेची दुर्दशा त्या राष्ट्राच्या पतनाचे मुख्य कारणं ठरते .  देशातल्या बहुतांश भूभागात जी भाषा लिहिली , बोलली व वाचली जाते त्या भाषेची लिपी देवनागरी आहे . इतकचं नव्हे तर काही भाषेंची ( जसं -मराठी ) लिपी देखील देवनागरीच  आहे . देशात प्रकाशित प्रसारित दैनिक वर्तमानपत्र आणि नियतकालीन पत्रिकां ७५ टक्के हिंदी भाषेत असतात . टीव्ही च्यानल्सचे सर्वात जास्त  दर्शक हिंदी भाषिक आहे . सर्वात जास्त दूरभाष व भ्रमणध्वनी वापरणारे हिंदी भाषिक क्षेत्रातले आहेत . 
-शिक्षणाची व्यवस्था अर्थात प्राथमिक शाळा ते महाविद्यालय आणि उच्च शिक्षणापर्यंत व त्यात शिक्षण घेणाऱ्या सर्व वयोगटातली मुलं  देखील सर्वात जास्त हिंदी भाषिक क्षेत्रातली आहे . सन २००३ - २००४ मध्ये केंद्र शासनाचे शिक्षणासाठी एकूण १०१४५ कोटी रुपयांचे बजेट होते जे सन २००९ -२०१० मध्ये चारपटीने वाढवून ४४५२८ कोटी रुपये केले गेले . या रकमेच्या ८० टक्के रकम हिंदी भाषिक क्षेत्रासाठी होती . पण इतकं असूनही भ्रष्टाचारामुळे व अव्यवस्थेमुळे  सरकारी शाळा व महाविद्यालये रिकामी असतात तर इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणाऱ्या बड्या आणि प्रभावशाली लोकांची शाळा आणि  महाविद्यालये भरभराटीवर आहेत . एकूण काय देशात सर्वात जास्त उतप्न व कर संग्रहण हिंदी भाषिक क्षेत्रांपासून होतो आणि सर्वात जास्त रक्कम इंग्रजी भाषिकांच्या सुखसोयीसाठी व त्यांचाच विचार करून खर्च केली  जाते  . अशात एक प्रश्न स्वाभाविक मनात येतो देशात हिंदी सकट क्षेत्रीय भाषांना मुळापासून खोदून फेकण्याचे काम कोण करीत आहे ? 
-सर्वात मोठा कुटिल धाडसी कटकारस्थानी म्हणजे बाजार . मोठे व्यावसायिक व उद्योजक घराणे . भारताचा उपभोक्ता बाजार जगात फार मोठा आहे . यात आता परराष्ट्रीयांना देखील देशात व्यापार व्यवसाय करण्याची परवानगी मिळालेली आहे . ज्या भाषेत पैश्यांचा पाऊस पडतो , भांडवल आणि भांडवल बाजाराची तीच भाषा असते . फक्त एकच उदाहरण पुरेसे आहे . आम्ही भारतीय ( विशेष म्हणजे तरुण वर्ग ) रोज ७० लाख लिटर पेक्षा जास्त थंड पेय ( सॉफ्ट ड्रिंक ) गटकतो . हा आंकडा संघटीत क्षेत्राचा आहे . या मुळे  ' पेप्सी ' आणि  ' कोकाकोला 'सारख्या परदेशी कंपन्यांची चांदी आहे . या पेक्षा कितीतरी पटीने जास्त असंघटीत क्षेत्रात , उसाचा रस , लिंबाचा रस ( लिंबू पाणी ) ताक 
( लस्सी ) आंब्याचा रस  , कोकम सरबत , विकले  जातात .  पण यांची  मोजणी होत नाही आणि यांची जाहिरात देखील कुठं बघायला मिळत नाही .  म्हणजेच सरकारी दरबारी या विक्रीसाठी कुठं ही प्रोत्साहन नसते . या उलट , ' पेप्सी ' ,  ' कोकाकोला ' सारख्या परदेशी कंपन्यांसाठी पायघड्या घातल्या जातात . दहा दहा पटीने जास्त किमंत असून सुद्धा तरुण वर्ग यांच्याच मोहपाशात अडकलेला दिसतो .स्वत:ला इंग्रज आणि पुरोगामी दाखविण्याची एक स्पर्धा , होड दिसून येते , ज्यात पेप्सी किंवा कोकाकोला प्यायलो नाही तर आपण पुरोगामी असूच शकत नाही असा एक समज ( गैरसमज ) तरुण वर्गात दिसून येतो . म्हणून असल्या पदार्थांची विक्री जास्तच जास्त वाढावी या दृष्टीने विक्री करणाऱ्या कंपन्या हिंदी भाषेत इंग्रजी भाषेचे काही शब्द मिसळून जे रसायन तयार करतात ते तरुंणाना खूपच स्वादिष्ट वाटतं .  पूर्ण इंग्रजी भाषा येत नसली तरी दोन चार साधे सोपे शब्द  ऐकून बोलून तरुणांना पुरोगामी झाल्याचा स्वर्गिक आनंद मिळतो . आणि हीच समाजातील दुखती नस ओळखून हे उद्योजक हिंदी ( क्षेत्रीय भाषा देखील ) भाषेत इंग्रजी भाषेंचे शब्द बळजबरीने गेल्या अनेक वर्षात मिसळण्याचा गुन्हा करीत आहे . समाजाला दुषित करीत आहे . आता कामापुरती इंग्रजी मिश्रित हिंदी अशी भेसळ भाषा निर्माण झालेली आहे . इंग्रजी भाषा येत नसली तरी , ' मेकडॉनल्ड ' मध्ये जाऊन ' पिज्जा ' खाऊन आणि  ' कोकाकोला '  पिऊन ,इंग्रजी मिश्रित हिंदीचा वापर केल्याने आजचा तरुण स्वत:ला गौरवान्वित झालेला समजतो . जो जितक्या पाश्चात्य रंगात बुडला  तो तितकाच जास्त पुरोगामी म्हणविला गेला . 
- आता आपल्याच राष्ट्रात  कोणी हिंदी भाषा ( आणि क्षेत्रीय भाषा देखील ) न आल्यामुळे किंवा बोलता न आल्यामुळे लाजिरवाणं  होत नाही . उलट इंग्रजी भाषा न आल्यामुळे न्युनगंडाने आजारी  पडतात . 
आणि बाजाराची गमंत बघा , गेल्या अनेक वर्षात इंग्रजी भाषा ही नोकरीसाठी , रोजगार व   व्यवसायासाठी फार फार गरजेची आहे असं  सर्वाना योजनाबद्ध रित्या पटवून देण्यात आलेले आहे . आणि यासाठी पाश्चात्य संस्कार यावे म्हणून रोजच नवे नवे ' डे ' साजरे होतात . ' वाढ दिवस ' आणि
 ' जन्मदिन  ' म्हणण्यात कमीपणा असतो . पण तेच , ' बर्थ डे ' म्हटल्याने भव्यता वाटते आणि मग सर्व बाजारच तुमच्या पाठीशी उभा असतो . ' बर्थ डे ' म्हणून तुमचा वाढदिवस साजरा झाला तरच तुम्हाला ' गिफ्ट ' देखील मिळते . वाढ दिवसासाठी तुम्हाला कोणी ' गिफ्ट ' देत नाही . अब्जावधी रुपयांच्या बाजार पेठेत अभिनंदन देखील इंग्रजी भाषेत करण्यात स्वत:चा गौरव समजला जातो . हिंदी मराठी च्या अभिनंदनाच्या संदेशात देखील इंग्रजीचे काही शब्द हमखास मिसळले जातात जेणे करून ते इंग्रजी शब्द रोजच्या बोलाचालीचेच वाटावे . 
- कधी कधी तर हा प्रश्न पडतो की , इंग्रज जाताना आपल्या देशाला ,  ' हाय ' , ' हेलो ' , थेंकयू ' सॉरी ' गुड मॉर्निंग , ' गुडनाईट ' , ' बाय बाय ' हे असले  शब्द नसते देऊन गेले तर आपल्या देशाचे काय झाले असते आणि बहुदा आपला देश  मागासलेलाच  राहिला असता .
- आता जेव्हा पासून एफएम  रेडियो सुरु झालेले आहेत  तेव्हाच पासून त्यांचेही धोरण इंग्रजीच्या प्रचार प्रसाराचेच आहे .  या रेडियोचे निवेदक ( जॉकी ) हिंदी भाषेत ( क्षेत्रीय भाषेत देखील )  बोलताना मुद्दाम  एक वाक्य हिंदीत एक वाक्य इंग्रजीत बोलतात . दुर्दैव म्हणजे हिंदी वाक्यातही ते एकाद दोन शब्द इंग्रजीचे मिस्लातता  .' मै ' संडे 'को आऊंगा ' असल्या वाक्यांना काय अर्थ आहे ? हे सर्व स्वाभाविक नाही . ज्या इंग्रजी  ज्या इंग्रजी शब्दांचा वापर हिंदी वाक्यात केला जातो त्या शब्दांच्या ऐवजी हिंदी भाषेचे फार सोपे व सरळ शब्द वापरण्यात येऊ शकतात . पण एका खास उद्येश्याने एका कुटिल योजने प्रमाणे हिंदी आणि क्षेत्रीय भाषांना त्यांच्या मुळापासून संपविण्याचे हे सर्व खटाटोप गरज नसताना देखील आपण पाहत असतो . 
- हिंदी भाषेचे सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे हिंदी भाषेला जोपासण्याचा दंभ भरणारे हिंदी भाषिक वर्तमान पत्र आणि नियत  कालिक चालविणारे आहे . आज या वर्तमान पत्रांमध्ये विक्री वाढावी म्हणून गरज नसताना देखील अनेक इंग्रजी शब्दांची आणि इंग्रजी जाहिरातींची  भरमार असते . ही या व्यावसायिक घराण्यांची बाजारपेठेला आहारी जाण्याची दुर्दैवी प्रवृत्ती हिंदी सकट क्षेत्रीय भाषांचा पुराचं विनाश करणारी ठरणार आहे . हिंदी आणि क्षेत्रीय भाषातले वर्तमान पत्र आणि नियतकालिका जर इंग्रजी भाषेचेच गोडवे गाणार असतील तर हिंदीसकट क्षेत्रीय भाषांना संपुष्टात आणण्या पासून कोणीच थांबवू शकत नाही . हिंदी आणि क्षेत्रीय भाषिक वर्तमान पत्र आणि नियतकालिका आणि टीव्ही च्यानल्स जर का इंग्रजी भाषेचाच उदो उदो करणार असतील तर प्रत्येक भाषा ही अनाथच असणार आहे .
- आता या सर्वांचा एक दुष्परिणाम असाही झालेला आहे की आज इंग्रजी भाषेच्या महागड्या पुस्तकांचा ही एक भला मोठा बाजार झालेला आहे व लोकं इंग्रजी भाषेचे पुस्तक विकट घेण्यास आपला गौरव समजतात .  पण  हिंदी सकट क्षेत्रीय भाषांच्या श्रेष्ठ दर्जाच्या बहुमुल्य पण स्वस्त: पुस्तकांना देखील
विकत घेण्यास कोणी तयार नसतं .  
- हिंदी चित्रपट , मालिका आणि  सर्वच प्रकारच्या जाहिरातींमध्ये देखील जाणीव  पूर्णक हिंदी आणि क्षेत्रीय भाषांना बिघडविण्याचे कटकारस्थान चाललेले आहे . संवाद असो की गीत असो यात इंग्रजी शब्दांची भरमार असते . आश्चर्य म्हणजे हिंदी आणि क्षेत्रीय भाषांमधले स्वत:च्या पोटापाण्याची व्यवस्था करणारे कलावंत  जेव्हा मुलाकात देतात तेव्हा ते फक्त इंग्रजी भाषेत बोलण्यातच  आपले वैशिष्ट्य  आणि  गौरव  समजतात . 
- हिंदी सकट क्षेत्रीय भाषांना संपविण्यात इंग्रजी माध्यमांनी शिकविणाऱ्या शिक्षण संस्थांचा व त्यासाठी असलेल्या त्यांच्या आपापसातल्या प्रतीस्पर्धेचा फार मोठा वाटा आहे . उत्तम रित्या हिंदी भाषेत शिक्षण देण्यासाठी कोणतीही प्रतिस्पर्धा नाही . पण इंग्रजी माध्यमांतून शिकविणे , दिवसरात्र इंग्रजी बोलण्यासाठी प्रोत्साहित करणे , न बोलू पावल्यास प्रताडित करणे व दुय्यम दर्जाची वागणूक देणे , या असल्या शिक्षण संस्थांचा एकमेव उद्देश्य ठरलेला आहे . इंग्रजी भाषा येणे तिचा शास्त्रोक्त अभ्यास करणे आणि चोवीस तास इंग्रजीत बोलणे आणि त्या प्रमाणे वागणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे .
हिंदी ठीक प्रकारे न बोलू शकल्यामुळे आम्हाला काहीच वाटत नाही . पण इंग्रजी न बोलू शकल्यामुळे आम्हाला स्वत:ची लाज वाटणे हे स्वत:च आपल्यामध्ये लाजिरवाणी होण्यासारखे आहे . पण स्वत:च्या  न्यूनगंडाची भावना लपविण्यासाठी लोकं तात्पुरते बोलचालीचे  इंग्रजी भाषेचे शब्द हिंदी भाषेत मिसळून इंग्रजी सुरात बोलतात . मुंबईमध्ये या प्रकारच्या ' हिंग्लिश ' भाषेला वापरून लोकं स्वत:ला गौरवान्वित समजतात . 
-श्रीमंत , आणि उच्चभ्रू मध्यमवर्गीयांमध्ये  इंग्रजीचा हा आजार फार विकृत स्वरुपात फोफावलेला  
आहे . पालक आपल्या पाल्यांना सर्वात महागड्या शाळेत शिकवू पाहतात . शाळांबरोबरच पालकांमध्ये देखील यासाठी चढाओढ आढळते . घरातही इंग्रजी बोलणे गर्वाची बाब समजली जाते . यद्यपि ती बोली शाब्दिक बोलचालीच्याच  भाषेची असते . गमंत ही की लोकं कुत्र्यांशी देखील हमखास इंग्रजी भाषेत बोलतात . अशा गर्विष्ठ लोकांचा भाषेशी तिळमात्र संबंध नसतो . लोकं दरवेळेस विसरतात की हिंदी , मराठी , राजस्थानी , हरियाणवी , अशा  अनेक भाषांची लिपी देवनागरी आहे . हिंदी भाषा किती सोप्या पद्धतीने बोलता , लिहिता , आणि वाचता येते आणि  लवकरच समजण्यातही   येते . 
आम्हाला जर्मन , चीनी , जपानी , रशियन किंवा फ्रेंच भाषा येत नाही म्हणून आम्ही लाजिरवाणे होत नाही मग इंग्रजी भाषा येत नाही म्हणून न्यूनगंड का असावा ? 
- सरकारी तंत्राची चर्चा करणे व्यर्थच आहे . नोकरशाह अद्याप देखील गुलामीच्या स्वप्नातच रमलेले आहे . स्वतचे वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी सर्व सरकारी व्यवहार  इंग्रजी भाषेतच  करण्याचा यांचा सदैव आग्रह असतो . याच लोकांनी गेल्या सत्तर वर्षात हिंदी भाषेला इंग्रजीच्या जाळ्यात अडकविलेले आहे . न्यायालयांना , ' मी लॉर्ड  ' आणि 'युवर ऑनर ' पासून अद्याप सुटका मिळालेली नाही . सरकारी तंत्रात आजही इंग्रजी भाषेतून  हिंदी भाषेत भाषांतर होते . अनेक वेळा ते  चुकीचे  व हास्यास्पद 
असते  . खरं तर हिंदीसकट सगळ्याच क्षेत्रीय भाषांमधून इंग्रजी भाषेत भाषांतराची व्यवस्था सरकारी तंत्रात असावी म्हणजे हिंदी सकट क्षेत्रीय भाषांना वाव मिळेल . इंग्रजी साठी हा मोह  एकंदरीत आमच्या राष्ट्रीयतेसाठी व राष्ट्र प्रेमासाठी जणू एक आव्हानच आहे . 
- दैनंदिनी दिनचर्येत शुध्द साहित्यिक भाषेची अपेक्षा कोणालाच नसते . पण बोलचालीच्या भाषेची दुर्दशा व्हायला नको . पण भाषेचा मुद्दा कुठे तरी भावनांचा व अस्मितेचा मुद्दा असायला हवा . पण आज फक्त राजकारण आढळते . अर्धवट पद्धतीने इंग्रजी भाषेचे शब्द हिंदी भाषेत मिसळून भाषेला खराब करण्याची प्रवृत्ती व भाषेसाठी  द्वेष बाळगणाऱ्या प्रवृत्तींवर कुठे तरी आळा घालण्याची गरज आहे . 
- या देशात फक्त एकच दिवस आपण ' हिंदी दिवस ' साजरा करतो . जेव्हा की ३६४ दिवस इंग्रजी भाषेसाठी राखीव असतात . राष्ट्र भाषेची दुर्दशा थांबवायची असेल तर वर्षातून एकच दिवस ' इंग्रजी दिवस ' साजरा करायला हवा व ३६४ दिवस हिंदी भाषेसाठी राखीव ठेवण्याची गरज आहे . 
----------------
समाप्त

- लेखक  - विश्वनाथ शिरढोणकर , इंदूर , म.प्र. मो - ९१९८९३१२५२४७
 
 
 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू