पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

बदनाम ती

बदनाम ती

संक्रमण केलेल्या सूर्याला
तिनं चुलीवर अर्ध्य दिलं दुधाचं;
ओसंडून

वाळीत टाकलेल्या काळ्या रंगाला
सन्मानलं
काळी चंद्रकळा नेसून

त्या तीळाच चिमुकल्या रूपडंचं बदललं
बोटं उकळत्या पाकात पोळून

यकश्चित कागदाच्या कपट्याला
मुक्त अस्मानात
निर्भीडतेच भान दिलं
पतंग बनवून

तरीही ती बिचारी उपेक्षितचं...
नुसती उपेक्षितच नाही तर
संकटं घेऊन येणारी म्हणे

उगीचच
चेटूक केल्याचा आळ घेऊन
उध्वस्त केलेल्या
विद्रूप एकाकी म्हातारीसारखी
बदनाम

बदनाम झाली आहे तरी
नशिबाला बोल लावणा-या
कर्तव्यतत्पर गृहदेवतेपरि
तीळगूळ नि वाण लुटून
गोड बोलण्याचा संदेश देतेच आहे
न चुकता प्रत्येक वर्षी
ती... ... मकरसंक्रांत

नीलिमा रवि

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू