पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मकरसंक्रमण

सवय लागता मधुरवचांची
हवे कशाला तिळगुळ ते!
कटुशब्दांनी होती वेदना
मन अती क्रोधित रे होते!

यास्तव करु साजरा सण
हा मकरसंक्रमणाचा
तिळागुळासम अतूट राहो
स्वभाव आपुला मोलाचा!

चला मिटवुया कलहही आता
जे व्यर्थ जगी भासती
एकदिन परी सोडुनी अवघे
जाणे जीवनाची परिणती

सुखेन राहु जपत आता अन
करु विश्वबंधुत्वअंगिकार,
नकोच देवा अधिक मागणे
नसुदे जगी मिथ्याचार!

©️ डाॅ.श्रीकांत औटी
नेवासा

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू