पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

संक्रांत भेट

थंडी किती हवीहवीशी
अन् संक्रांत असे वेगळी
शाळेला असायची सुट्टी
तिळगूळाची गोडी आगळी।।

भेटकार्डात असायचे छोटे
हलव्याचे पाकीट छान
त्यातले चार दाणेसुध्दा
वाटायचे किती महान!।।

नव्या युगाने आणला
नवा इंटरनेटचा खेळ
आभासी झाला आता
तीळ आणि गुळाचा मेळ।।

कालाय तस्मैः नमः म्हणत
तोही गोड मानून घेऊ
तिळगूळ घ्या गोड बोला
चला गूळपोळी सुध्दा खाऊ।।

पतंगाची आकाश भरारी
अन् मांजाची दोरी हाती
हसत खेळत साजरी करु
चला आज मकर संक्रांती।।

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू