पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

होकार

कांय, अनघा यंदा लग्नाचे लाडू आम्हाला मिळणार ना??

केळकर काकूंनी समोरून येणाऱ्या अनघा कडे बघून विचारणा केली.

अनघाने काकूंकडे बघत काहीसे स्मित केलें व झरझर पावले टाकीत घरा कडे वळली.

मागल्या वर्षीच पदवीधर झालेली अनघा चांगल्या नोकरीवर रुजू झाली होती

सावळी, सतेज कांतीची, कमनीय बांध्याची रेशमी लांब सडक मुलायम केसांची अनघा सर्वांनाप्रथम दर्शनीच आवडायची पण कितीतरी गर्भ श्रीमंत बिजिनेसमॅन, विदेशात स्थायिक झालेले इंजिनीयर्स, lA S. ऑफिसर्स ला अनघाचा नकार असायचा तिचे आई वडिलांना देखील काही उमजत नव्हते पण त्याचे एकच कारण होतें.... सतरा, अठरा वर्षाचा अथर्व!!

लहानपणीच्या मस्तिष्क च्या प्रदीर्घ आजाराने अपंगत्व आलेला काहीसा मंद बुद्धी असलेला पण ममत्वेनें पूर्णपणे ओतप्रोत, अतिशय लाघवी असा तिचा लाडका, आवडता लहान भाऊ..... पण तोच तिचा लहान भाऊ येणाऱ्या उपवर मुलांना आवडत नसे. प्रेम तर दूरच, प्रथम दृष्टीत त्यांच्या नजरेत त्याच्या विषयी तिरस्कारच प्रगट होत असे व नेमके हेच अनघाला नको होतें.

आज देखील घरात शिरल्या बरोबर हॉल ची सजावट बघूनच कोणीतरी पाहुणे येणार असल्याचा कयास तिनें बांधला!

"अनु पटकन काहीतरी खाऊन घे व छान तयार हो, डॉ गोखले, मनोरोग विषेशज्ञ् सहा वाजेपर्यंत येतीलच!"

आईच्या आवाजाने ती भानावर आली तिचा अंदाज बरोबर होता.

स्वतः तयार होऊन, अथर्व ला तयार करून त्याला व्हिलचेयर वर बसवून हॉल मध्ये आणले, आईच्या नाराज नजरेकडे तिनें दुर्लक्षच केलें.

काहीतरी वेगळे होत आहें असे वाटून अथर्व आनंदाने टाळ्या पिटत होता, मध्येच तोंडाने चित्र विचित्र आवाज काढत होता तोंडातून लाळ गळत होती.

एवढ्यात दारावरची बेल वाजली, आईने दार उघडले ती एका बाजुला कोपऱ्यात उभी होती.

डॉ ला बघताच अथर्व हात पाय आपटीत, तोंडाने आ... आ.. असे विचित्र आवाज काढू लागला.

डॉक्टर नें वाकून आपले बूट काढले. अनघा त्याच्या हालचाली डोळ्याच्या कडेने टिपत होती. बूट काढून तो

अथर्व कडे वळला व अथर्व चा हात हातात घेतला व त्याच्या पाठीवर थोपटले. अथर्व शांत झाला

अथर्वचा हात हलकेच सोडवून तो बाजुला वळला व सोफ्यावर येऊन बसला

अनघा बरोबर जुजबी बोलून, कांदे पोह्याचा पाहुणचार घेऊन निघायच्या अगोदर त्याने हळूच तिच्या कडे बघितले.

अनघाच्या डोळ्यातून कृतज्ञतेच्या आसवामागून

हसरा होकार झळकत होता!!!

 

 

डॉ विद्या वेल्हाणकर

अंधेरी, मुंबई.

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू