पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

निर्जीव की सजीव

निर्जीव  की सजीव.....


ज्ञानदेव म्हणता माया । गेलि समूळ विलया । । संत महिमा वर्णू किती ।

निर्जीव चालवली भिंती |


खरंच आहे निर्जीव आणि सजीव हया एकाच नाण्याच्या दोन बाजू..


आम्ही शाळेत असतांना  दोन प्रकार शिकलो. पहिली सजीव आणि दुसरी निर्जीव !!

सजीव म्हणजे ज्यात जीव आहे, ऊर्जा आहे आणि जी ऊर्जा त्याच्या सजीवपणाचे खरे प्रमाण आहे .

सजीव हे आयुष्य जगतात. त्यांची वाढ होते,आपल्या भाषेत प्रगती होते. पण शेवटी ते सुद्धा एक दिवस नष्ट होतात हा सृष्टीचा नियम आहे.

सजीवांचाही एक जीवन काळ असतो, त्यांच्या जीवनाचा एक साचे बद्ध आलेख तयार होतो.आम्ही आजपर्यंत फक्त सजीव गोष्टींचाच विचार करत आलो.

पण मग निर्जीव प्रकाराबद्दल काय?

त्यांना आयुष्य नसते का? की फक्त निर्जीव म्हणून त्यावर विचारच करायचा नाही..

निर्जीव  मध्ये पण दोन प्रकार पडतात. एक नैसर्गिक आणि दुसरा तयार केलेला!!


निर्जीव वस्तू कडे तुम्ही कोणत्या दृष्टीकोनातून बघता त्यावर तुमची मानसिकता अवलंबून असते.


अगदी नवीन घेतलेली साडी किंवा शर्ट तसाच आलमारीत पडून राहतो आणि ती /तो आलमारीतच विरून जाते म्हणजे नेमकं काय होत?

त्या निर्जीव वस्तूचा सुद्धा अंत होतो का?

मला वाटत निर्जीव वस्तुंना देखील आयुष्य असत त्यांचाही ऱ्हास होत असतो.

आता हेच उदाहरण घ्या, नवी कोरी साडी किंवा अगदी नवीन शर्ट तसाच वर्षानुवर्षे आलमारीत पडून राहिला तर त्या निर्जीव वस्तूचा काय उपयोग?

ती वस्तू तयार होणे म्हणजे तिने जन्म घेणे बरोबर ना?


मग तिचे खरं आयुष्य म्हणजे तिचा मान सन्मानाने वापर होणे हेच त्या वस्तूचे तयार होण्याला किंवा जन्माला येऊन सार्थक झाले असे म्हणता येईल, अन्यथा तो जन्म व्यर्थच आहे.

आपल्या भारतीय संस्कृती मध्ये निर्जीव वस्तूंची सुध्दा पूजा केली जाते, त्यांना मान दिला जातो. दसऱ्याच्या दिवशी मोठ मोठी यंत्र,अवजारे यांची पूजा होते. त्या मागे सुध्दा हाच दृष्टीकोन की निर्जीव वस्तू सुध्दा एक अदृश्य आयुष्य जगत असते आणि तिचा योग्य मान सन्मान राखला तर तो आपल्याला योग्य परतावा देते.


मनातला भाव आणि आदर त्या वस्तूला जिवंत स्वरूप देतो आणि म्हणूनच कधी कधी एखादी वस्तू अतिप्रिय होऊन जाते आणि ती हरवली तर हुरहूर लागते.

जितकं आपण यांच्यावर प्रेम करू तितकी ती जास्त दिवस टिकतात त्यांचे आयुष्य वाढते हे मात्र सत्य आहे.

कधी कधी एक साधा पेन हा आपला जिवलग होतो,तर कधी पांघरायची आईने शिवलेली साडीची गोधडी आवडायला लागते,कधी एक ठराविक चहाचा  कप मित्र बनतो तर कधी बाहेर उभी असणारी सायकल मैत्री करते.कधी एक सुंदर सदरा आपल्याला आकर्षित करतो आणि तोच घालावासा वाटतो,लहान मुलांना खेळणी जीव की प्राण बनते त्यांना ती खेळणी सोडूशी वाटत नाही, रात्री झोपतांना सुध्दा ती जवळ घेऊन झोपतात.हे सगळे निर्जीव असतात पण यांच्यात जीव अडकतो तो सजीवांचा.


रस्त्यावर शेंदूर लावलेला दगडात आम्हाला परमेश्वराचे रूप दिसते तो आमचा देव बनून नतमस्तक व्हायला लावतो तोच आमचं श्रद्धास्थान बनतो.

निर्जीव मूर्ति जेव्हा परमेश्वराचे रूप धारण करते तेव्हा साक्षात भगवंताचा अवतार त्या मूर्तीत उतरतो, तेव्हा त्या मूर्तीला सुद्धा किती तेज येते.

हजारो वर्षांपासून उभे असलेले पर्वत, डोंगर ,दऱ्या हे सर्व आम्हाला जो आनंद देतात तो खरा त्यांच्या अस्तित्वाने. बहुदा हेच कारण असावे की हिंदू संस्कृतीत सगळीकडे भगवंताचे रूप  दिसण्याचे आणि मानण्याचे.........


-प्रकाश फासाटे.

मोरोक्को

नॉर्थ आफ्रिका.

212661913052


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू