पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

निशिगंध

निशिगंध


मंदसुगंधी निशिगंधाशी

अबोल जुळता प्रित,

मना मोद तो पहा होतसे

जणु अवचित गवसे मित।


वायुसंगे गंध विहरता

जुळले अबोल नाते,

पुष्प कोवळे नाजुकसुंदर

मोहुनी बघ मन जाते।


अवचित येता गंध दुरुनी

मोहित मनही प्रमुदित रे,

गजरा त्याचा देऊ प्रियेला

दूर उदासी होईल रे।


अवचित दिसता पुष्प हे सुंदर

गझल घुमते मनात ती,

निशिगंधा रे जडली माझी

पुष्प द्रुमावर अजब प्रीती।


©️ डाॅ.श्रीकांत औटी

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू