पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

माझी परी

*बालिका दिनानिमित्त*
चिऊ माऊ चिऊ माऊ
याल का माझ्या घरी
दाखवते मग तुम्हाला
इवलिशी माझी परी

गोल गोल गोरे गोरे
गाल तिचे जशी पुरी
चुरू चुरु बोले कशी
जीभ तिची जशी सुरी

डगु मगू डगु मागू
चाल तिची न्यारी किती
पडेल आता का नंतर
वाटते नेहमी भीती

दातांच्या ऐवजी बोळक
हसते पहा कसे छान
आईने ओढून ओढून 
केले मोठे तिचे कान

हाताने करून इशारे
मला जवळ बोलवते 
बोबड्या आवाजात
मला ताई ई ई म्हणते

गोड गोड परी माझी
आवडेल नक्की तुम्हाला
सुंदर ही भेट नाजूक
देवाने दिली ही आम्हाला
©सौ. अनला बापट

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू