पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

हित अहित पहावे

मन सृष्टीचं माझिया
जरा जाणुनी हे घ्यावं
नका करु रे पाडावं
रुप हिचं वाढवावं॥धृ॥


सृष्टी चैतन्य मागते
येत्या चैत्राला म्हणावं
नववर्ष नवगीत
हिचं कोकिळेने गावं॥१॥


तिच्या स्वर-माधुरीत
विश्व न्हाऊन निघावं
शब्द शब्द कवितेचा
गांव अमृताचा व्हावं॥२॥


चला सावरु या सृष्टी
टाळण्यास अतिवृष्टी
नका करुनी पाडावं
तिला करु दुःखी कष्टी॥३॥


शिशिराच्या पाचोळ्याला
आता होळीत जाळावं
पुरणाच्या पोळीने का
होळीमधे स्वाहा व्हावं॥४॥


अन्न पूर्णब्रम्ह त्याचं
जरा महत्व जाणावं
आम्हासाठी योग्य ते ते
होलीकेत का जाळावं॥५॥


योग्यायोग्य विचारांचं
जरा मंथनही व्हावं
सण करावेत पण
हित अहित पहावं॥६॥


*--निसर्गसखी सौ मंगला मधुकर रोकडे.*
*शब्दसृष्टी*, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :- ९३७१९०२३०३.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू