पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

वर्ष संपले वर्ष संपले

॥ वर्ष संपले , वर्ष संपले॥

 

गुलाबी थंडी घेऊनि सांगाती ,

          जानेवारीचा महिना आला ॥ १

दोन दिवस आधीच घाईने ,

          फेब्रुवारी तो मावळला ॥ २

सप्तरंगांची फुहार उडवीत,

           मार्च महिना उजाडला ॥ ३ 

रंगपंचमी निमित्त होई ,

           उधाण येई आनंदाला ॥ 

ग्रीष्म ऋतूची ओळख करवीत,

           एप्रिलही की सुरू झाला ॥ ४

तप्त उन्हाचे चटके देऊन ,

           मे करी व्याकुळ धरणीला ॥५

रिमझिम , रिमझिम , किंचित बरसून,

            जून जागवी भूमातेला ॥६

अधीर प्रियकरागत, संतत कोसळत ,

         पाऊस जुलैचा सुखवी वसुंधरेला ॥ ७

काय प्रीतीची वर्णू नव्हाळी ?

         ऑगस्टाने किमया केली ॥ ८

नव्या नवरीगत लाजून धरती ,

          हिरवा शालू लेऊन बसली ॥

' राखी ' बांधण्या भाऊरायाला ,

        बहिण घरोघर अधीर झाली ॥

सणासुदीचा सांगावा घेऊनि ,

        सज्ज होऊनि सप्टेंबर आला ॥९

सण गौर , गणपती समीप येई ,

         मखर , सजावट धांदल होई ॥,

        साफ _ सफाईची गडबड होई ॥

गणपती बाप्पा मोरया,

             फेर धरुनि नाचू या ॥

दहा दिवस आनंदात डुंबले ,

             बाप्पांचे विसर्जन झाले ॥

पण संस्कार नाही विसरले,

        पितृपक्षी पितरांचे तर्पणही झाले ॥

नवरात्रीची होई घाई ,

          व्याघ्रावर बसुनि भवानी येई ॥

गरबा दांडिया झुंबड होई,

रावण दहन , सीमोल्लंघन करऊनि ,

       अंबा- माता परतुनि जाई ॥

ऑक्टोबर म्हणे मी वर्षाचा राजा ,

       दिवाळी सण हक्काचा माझा ||१० ||

 फराळ , कपडे , आतषबाजी ,

      झगमग रोषणाई ,

नातलगांची गर्दी होई ॥

भाऊबीजेचा दिन वर्षाचा ,

          बंधु -भगिनी अतूट प्रेमाचा I

नोव्हेंबर ( मार्गशीर्ष ) व्रतवैकल्याचा ,

        उपवास करावा गुरुवारचा,

मनन , चिंतन करण्याचा l

सण , संस्कार, धर्म अनुसरले

          विचार करा हो गरजूंचा ,

हेच फलित मनन चिंतनाचे ॥ ११||

डिसेंबरचा महिना उजाडला ,    

         क्रिसमस तोंडावर आला,

सांताक्लॉज बनून आपण,

         दान देऊया दोन्ही हाती I

संदेश समजुनि क्रिसमसचा ,

      करु साजरा सण वर्षाचा ॥

३१ डिसेंबरचा दिन आला ,

      चला आतषबाजी पहायला ॥१२||

बारा महिने आले , गेले ,

      वर्ष संपले , वर्ष संपले I

आभार मानुनि देवाचे ,

करु या स्वागत नववर्षाचे ,

करु या स्वागत नववर्षाचे ॥

 

सुलभा गुप्ते

पुणे

२५ .१२ .२०२२

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू