पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात मनाची मशागत

पुस्तक आढावा
पुस्तकाचे नाव- सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात मनाची मशागत
लेखक- डॉ. दत्ता कोहिनकर
मुद्रक- क्रांती एजन्सीज, पुणे
आवृत्ती- 25 वी, जुलै 2022
किंमत- तीनशे रुपये
Best Seller Book

                  लेखक, मुक्त पत्रकार, योगगुरु तसेच ज्येष्ठ व्याख्याते डॉ. दत्ता कोहिनकर सरांचे काही लेख या पुस्तकाविषयी दैनिक पुण्यनगरीमध्ये मी वाचलो होतो. ते मला अतिशय आवडले होते, त्यावेळेसच मनात ठरवलं की, हे पुस्तक मिळवून वाचायचं. ऑक्टोबर 2017 ते ऑक्टोबर 2022 या काळात माझ्या अपघातामुळे माझ्या उजव्या पायावर जवळपास आठ शस्त्रक्रिया झाल्या. या काळातच मी नवोदित कवी, लेखक झालो.वाचनाची पूर्वीपासूनच आवड होती, परंतु मध्यंतरी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये सायन्स टीचर म्हणून काम करत असल्यामुळे पाहिजे तसा वेळ मिळत नव्हता. सुदैवाने म्हणावे लागेल (मनाची मशागत) अपघात झाल्यामुळे बाहेर पडता येत नव्हतं, त्यामुळे या काळात अनेक पुस्तके वाचली गेली.आता कायमस्वरूपी अपंगत्व आल्यामुळे सहजासहजी बाहेर पडणं तसं होत नाही, साहजिकच पुस्तक हाच सोबती झाला.असो!
                        कोहिनकर सर आमच्या 'आम्ही साहित्यिक' या व्हाट्सअप ग्रुपचे सदस्य आहेत. त्यांनी त्यावर दिवाळीनिमित्त हे तीनशे रुपयेचे पुस्तक दोनशे रुपयेला भेटेल सवलतीत असे जाहीर केले होते. अजूनही स्कीम चालू आहे.'इच्छा तिथे मार्ग' या म्हणी प्रमाणे मी लगेच सरांना फोन करून पुस्तक कसं मागवायचं असं विचारलं? त्यांनी विस्तृत माहिती मला दिली, त्याप्रमाणे मी माझ्या पुण्याच्या बहिणीला ते सांगितलं. तिने ते माझ्यासाठी मागवून दिवाळीत येताना गावाकडे आणलं.
                  व्यक्तिमत्व विकास, प्रेरणात्मक किंवा नॉन फिक्शन म्हणजेच अकल्पनात्मक पुस्तके वाचण्याकडे माझा जास्त कल असतो. जेणेकरून आपल्याला त्यातून काहीतरी भेटलं पाहिजे. हे पुस्तक खूपच प्रेरणात्मक असून पुस्तकात एकूण 123 लहान- लहान धडे आहेत. त्यातील काही सत्य घटनेवर तर काही कल्पनात्मक आहेत. प्रत्येक धड्यातून एक मूल्य बाहेर येतं.जे आपल्याला जीवन जगण्यासाठी खूपच उपयोगी पडतं. पुस्तकाची भाषा अतिशय साधी, सुटसुटीत, सोपी आणि वाचकाला समजेल अशी आहे.आज काल प्रत्येक जण आपल्या कामांमध्ये इतका व्यस्त आहे की, त्याला इतरांकडे लक्ष द्यायला सुद्धा वेळ नाही. अशा वेळेस माझ्यासारखे अपघाती  अपंगत्व आलेले,वर्षानुवर्षे आजारपणात असलेले, मधुमेही बी.पी.चा त्रास असणारे कर्करोगांनी पछाडलेले, ध्येयप्राप्ती हुकल्यामुळे नैराश्येत गेलेले किंवा आपला व्यवसाय चालत नसल्यामुळे व्यसनाधीन झालेले किंवा लग्न मोडलेले किंवा ब्रेकअप झालेल्या लोकांना हे पुस्तक म्हणजे एक संजीवनीच आहे. नैयराश्येत गेलेल्या  किंवा आपले मन मजबूत करण्यासाठी मुला- मुलींसाठी लेखकाने 'विपश्यना' हा एक चांगला पर्याय सुचवलेला आहे. वयोगट 9 ते 18 वर्षे, विपश्यना केंद्र, स्वारगेट, पुणे
फीस- विनामूल्य
प्रत्येक महिन्याच्या प्रथम रविवारी
www.uvidhamma.org
                       नावाप्रमाणेच हे पुस्तक तुमच्या मनाची मशागत नक्कीच करेल.व्यक्तिमत्व उजळून, चारचौघात तुम्हाला एक तरतरी निर्माण करून, पुनश्च जीवन जगण्यासाठी प्रेरणा देणारे हे पुस्तक आहे. एका काचेच्या भरणीत पिठीसाखर ठेवली व दुसऱ्या काचेच्या भरणीत मीठ ठेवलं. तुम्हाला कोणत्या भरणीत साखर आहे? हे विचारल्यानंतर दोन्ही भरणीतील पदार्थांची चव घ्यावी लागेल.तसं या पुस्तकाचं आहे जोपर्यंत तुम्ही ते स्वतः वाचणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला त्याचं महत्त्व कळणार नाही, म्हणून मी प्रत्येकाला विनंती करतो की, हे पुस्तक आवर्जून वाचाच.
                     डॉक्टर दत्ता कोहिनकर सरांना असंच पुढे एखादं प्रेरणात्मक पुस्तक लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा!

©®-विश्वेश्वर कबाडे
(नवोदित कवी,लेखक),अणदूर
ता.तुळजापूर
भ्रमणध्वनी-9326807480

पुस्तकाविषयी अजून स्किम चालू आहे,सरांचा संदेश मी खाली Copy Pest करतो.त्यांनी हे पुस्तक esahitya वर मोफत उपलब्ध करून दिले आहे.

*विशेष सूट. ????                           नववर्षानिमित्त बऱ्याच लोकांनी इतरांना भेट देण्यासाठी, मी लिहिलेल्या 'सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात मनाची मशागत" या बेस्ट सेलर पुस्तकाची मागणी केली आहे. लोककल्याणाच्या भावनेने 300 रुपयांचे हे पुस्तक नववर्षानिमित्त आम्ही 200  रुपयाला उपलब्ध करून देत आहोत. 25 पेक्षा जास्त प्रति घेतल्यास अजून जास्त सूट देण्यात येईल. माझे दुसरे पुस्तक "सुखाचा पासवर्ड"यावर देखील विशेष सूट देण्यात येत आहे. वाचकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल त्यांच्याविषयी असीम कृतज्ञता. सर्वांना नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा*.*डॉ. दत्ता कोहिनकर.. माईंड पॉवर ट्रेनर*.  *Mob. ९८२२६३२६३०, 88 30 78 51 50*." मनाची मशागत" या पुस्तकाची मोफत पीडीएफ देखील खाली देत आहोत नक्की वाचा.           http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/manachi_mashagat_datta_kohinkar.pdf

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू