पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

बाय बाय २०२२

उगवतो त्याचा अंत नक्कीच असतो..त्या उक्ती अनुसार..उगवलेल्या सूर्याचा अंत आहेच..सुर्यासोबत सुरू झालेल्या दिवसाचा अंत ..आणि दिवसासोबत सुरू झालेल्या वर्षाचा पण अंत निश्चितच होता.

परंतु वाटले जसे २०२२ खूप लवकर संपले. 

अजून कुठे आत्ता आत्ता तर कॉरोनाच्या त्या भीषण पिडादायक वर्षातून म्हणजे २०२१ मधून २०२२ मधे आलो होतो. कित्येक जवळचे नातेवाईक मित्र ह्यांना गमवायचे दु:खाश्रू  अजून पूर्ण वाळले पण नव्हते आणि त्यांची वर्षश्राद्धे करायची वेळ येऊन ठेपली होती. पुन्हा एकदा आपल्या हातात काही नाही त्याची तीव्र अनुभूती झाली होती!

तरीही..काही गोष्टी सुखद पण घडल्या ज्याच्यामुळे दुःखाचे सावट कमी झाले.

मला स्वतः ला म्हणाल तर, २०२२ चे वर्ष खूप रचनात्मक राहिले. आपल्या कृतींना जेव्हा लोकांसमोर प्रस्तुत करायची संधी मिळते तेव्हा तो आनंद अवर्णनीय असतो..असेच काहीतरी माझ्या बरोबरच पण घडले, माझी अनेक वर्षापासून बाकी राहिलेली पुस्तके, "मोहिनी", "भावपुष्प २" आणि "भावपुष्प ३" ही शोपिझन प्रकाशनच्या मुळे आणि शोपीझनच्या संपर्क अधिकारी ऋचा करपे ह्यांच्या मदतीने प्रकाशित झाली. त्याशिवाय अनेक चित्रेपण मी शोपीझन वर प्रकाशित केली. माझ्यातल्या कलाकाराला एक विशेष संतोष प्राप्त झाला.

माझे अनेक लेख वेग वेगळ्या माध्यमातून प्रकाशित झाले आणि लोकांना ते आवडले, ह्याहून विशेष काय पाहिजे असते एका लेखकाला?

पण अनेक वेळेस फार वाईट वाटले ते काही कथेंकरता मिळालेल्या अगदी शुल्लक (फक्त ₹६०/-) मानधनाकारता! आपण लिहिलेली गोष्ट फक्त ६० रुपयाची किंमतिची नाही तरीही अपरिहार्य कारणाने विकातोय, तसेच आपल्या पुस्तकांना योग्य असा प्रतिसाद मिळत नाही , त्याच्या झालेला मनस्ताप हे सर्वात मोठे दुःख २०२२ सालचे!

हे करत असताना नेमक काय चुकते आहे ते कळेना. कुठेतरी काहीतरी कमी वाटत राहिले सतत..वाटले, आपण कुठेतरी मागे पडतोय. आपल्याला मिळालेल्या एक अद्भुत शक्तीचा पुरेपुर्ण उपयोग करत नाहीये. असे का वाटत आहे ते मला नाही समजले म्हणून मी माध्यम बदलून पाहिले..लिखणाकडून रंगांकडे वळले.अर्थात माझ्या त्या कृतींना पण लोकांनी लगेच चांगला प्रतिसाद दिला पण मला अजूनही ती मानसिक शांति नाही मिळाली जी मी सतत शोधत आहे.

घरच्या बाबतीत म्हणाल तर..वर्षाच्या सुरुवातीला जरा आर्थिक समस्या सुरू व्हायला लागल्या होत्या त्या काळ क्रमे वाढतच गेल्या..परंतु त्यातही मला एक शिकवण मिळाली..की कितीही सख्खे म्हणून घेणारे असले तरी माणूस एकटाच असतो.. वर्षांती पैश्याचे प्रॉब्लेम नाही सुटले पण अनेक नात्यांमधले रंग मात्र काळे पांढरे स्पष्ट झाले.

समस्या आल्या की मानव सहज प्रवृत्ती म्हणून ज्योतिषी भेट घेतली, आणि खरं सांगू आपल्या समस्या काहीच नाही हे जाणवून गेले,कारण तिथे आलेल्यांचे दुःख माझ्या पेक्षा काही पटीने अवघड आणि पिडादायक होते! तिथेच देवाचा आभार मानला मला फक्त एक दोन त्यापण किरकोळ समस्या दिल्यास म्हणून. आणि प्रश्न न विचारताच परत आले. कधीकाळी फक्त आपल्या पुरते विचार करणारी मी आता दुसऱ्यांचा विचार करून आपल्याकडे बरेच काही आहे, हे वरचे वर स्वतःला पटवून देऊ लागले. बहुतेक आता मी थोडे परिपक्व (की वृद्ध!☺️) होऊ लागले आहे.

गेल्या वर्षात अनेक नवीन मित्र मैत्रिणी आयुष्याच्या ह्या  वाटचाली मधे जोडले गेले तर काही खूप जवळचे सोडून गेले. सोडून गेलेल्यांची जागा कोणीच भरू शकत नाही.पण नवीन आलेले त्यांना विसरायला मदत करत आहेत,ते मात्र नक्की.

काही मैत्रिणींशी गाठ घट्ट झाली तर काहींना मी मैत्रिबंधातून मुक्त करून टाकले,कारण आमचे विचार वर वर जरी मिळत असले तरी खोल फार वेगळे होतो.

आज जेव्हा वर्षाची शेवटची पायरी उतरतो आहे तेव्हा, ह्या वर्षी काय मिळवले आणि काय गमावले ह्याचा विचार केला तर...वरच काही गमावले, अनेक जवळचे लोक/मित्र/ आप्त,पैसा, नोकरी, आणि मुळात मन शांती. पण मिळवले पण बरेच..मुख्य म्हणजे लोकांना ओळखायची दृष्टी, जीवन (आपल्याला काही झाले नाही ह्याचा संतोष), कुटुंबात निर्माण झालेली एकता , आपल्याला समाजात एक कलाकार म्हणून मिळालेली ओळख आणि सर्वात मोठे म्हणजे आपल्या पोटच्या पोरींनी दाखवलेले आपण पेरलेल्या संस्कारबीजाचे झाड ! 

पुढच्या वर्षी ह्या झालेल्या अनुभवांचा उपयोग नक्कीच होणार आहे. आणि म्हणूनच खात्री आहे की २०२३ गेल्यावर्षी पेक्षा चांगला आणि मन:शांती देणारा असेल.

तुम्हा सर्वांना ह्या इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू