पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

निरोप आणि स्वागत

निरोप आणि स्वागत 

~~~~~~~~~~~

 

सरत्या वर्षा  निरोप देऊ आनंदाने  आपण सगळे, 

नववर्षाचे स्वागत करु या जल्लोशाने आपण सगळे ...! 

झाले गेले सोडुन देऊ हव्या कशाला जुन्या स्मृती त्या ?

राग लोभ अन् हेवेदावे विसरुन जाऊ आपण सगळे ...! 

महामारी अन् रोगच आपले शत्रू आता समजुन घ्या हो,  

मानव जाती आरोग्यास्तव एक होऊ या आपण सगळे...! 

चिकटून बसण्या अर्थ नसे हो काही गोष्टी टाळा आता, 

जात पात अन् जुन्या रुढींना सोडुन देऊ आपण सगळे...!

उरली नाही इमानदारी असेच म्हणती सारे सारे, 

लाचखोरी अन् भ्रष्टाचारा टाळू आता आपण सगळे...! 

पूर्णत्वाला जातच नाहीत ठराव असले करु नका हो, 

जगण्यामध्ये नियमितता ही आणू आता आपण सगळे ...! 

सरत्या वर्षा  निरोप देऊ आनंदाने  आपण सगळे, 

नववर्षाचे स्वागत करु या जल्लोशाने आपण सगळे ...!

 

 

दिवाकर चौकेकर, 

गांधीनगर (गुजरात) 

मोबाईल  :  9723717047. 

 

 

 

 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू