पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सॉरी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इयत्ता तिसरी चौथी च्या ईयत्तेत असेल तेव्हाची ही गोष्ट , चार-पाच दगडाच्या बांधलेल्या खोल्यांच्या वर काही सिमेंटचे पत्रे तर काही लोखंडी पत्रे टाकून बनवलेली शाळा, त्या शाळेला समोरच पुढे ओझरती पत्र्याची पडवी त्या पडवीला चौरसाकाराचे लाकडी खांब आणि खांबापासून पाच मिनिटाच्या अंतरावरती पुढे ध्वजारोहणासाठी रोवलेला खांब, जून महिना असावा तो शाळा उघडून एक दिवस झाला होता आदल्या दिवशी पाऊसही झालेला होता त्याची चिन्ह शेजारी जाता येताना साचलेल्या खाज खळग्यातील पाण्यात पोरं पहात होती बहुतेक, पाण्यामध्ये उतरण्याची इच्छा होत असावी  , माझ्यासाठी शाळेचा यावर्षीचा पहिलाच दिवस होता आणि इतरांबरोबर मी देखील, खास करून बहिणी मुळे लवकर आलो, आम्ही दोघे एकाच वर्गात होतो त्यामुळे ती पुढे गेली तर मला तिच्याबरोबर शाळेत जावंच लागत असे नाहीतर घरच्यांच्या अनावश्य प्रश्नांचा भडिमार सहन करण्यापेक्षा हे अधिक योग्य वाटत आणि त्यामुळे मी जरी लवकर पुढे आलो तरी खेळण्याशिवाय मी दुसरीकडे लक्ष देत नसे , एक तासभर असं तसं खेळलो असेल आणि हळूहळू सुरू झाली मुले येण्याची वेळ   अनेक मुले मुली आल्यानंतर गेटमधून येताना मला एक खूप सुंदर निरागसअतिशय सुंदर अशी मुलगी दिसली, तिच्याबरोबर घरचे कोणीतरी आणखी तिला सोडायला आले होते आणि त्यांच्या जोडीला त्या मुलीपेक्षा लहान आणखी दोन मुले होती एक शाळेच्या ड्रेसवर आणि दुसरा दिसायला विशेष म्हणजे तो मुलगा नवी बनेल आणि अंडरवेअर हा असाच त्याचा पेहराव होता, त्यांना घेऊन येणारी व्यक्ती  घरच्यांच्या कुणाच्य  तरी ओळखीची असावी, मी त्या झेंड्याच्या भोवती एका हाताने लोखंडी खांब पकडून दुसरा हात हवेमध्ये खाली झोकुन देत वर्तुळाकार पायरीला  गोल गोल घीरक्या घालत होतो. इतर सर्व मुले जवळ जवळ शाळेच्या नवीन पेहराव मध्ये येत होते पण काही माझ्यासारखे मागच्या वर्षीचा च जुना ड्रेस घालून येत होते  तासाभरामध्ये मातीशी खेळल्यामुळे माझा  ड्रेसही थोडासा मळकट झालेला असावा यामुळे की काय तिला काय वाटले हे काय माहित नाही पण तिच्या बरोबर आलेल्या पालकांना मी थोडासा भांडखोर वृत्तीचा टवाळाखोर नक्की वाटलो असेल , त्यामुळे माझ्याकडे बघत ते उद्गारले "पोरांनो भांडण करू नका ,एकमेकांना हाणामारी करू नका, नीट खेळा"असे बोलून काही वेळानंतर ते त्या ठिकाणाहून निघून गेले.मला मात्र काही न मिळवता एक वेगळाच आनंद मनोमन वाटत होता.
शिक्षक आल्यानंतर सुरुवातीला राष्ट्रगीत ,प्रतिज्ञा ,प्रार्थना झाल्यानंतर सर्व मुले वर्गामध्ये  बसली , एक तासानंतर शिक्षक वर्गाच्या बाहेर गेले वर्गामध्ये काय शिकवलं हे तर माझ्या लक्षात नाही पण वर्गामध्ये मुलांचा पुन्हा एकदा गोंधळ ऐकू आल्यामुळे शिक्षकांमध्ये आले दोन-चार जणांना राप, राप दोन-चार फटके टाकले त्यामध्ये मी एक होतो आणि त्यांनी सांगितले आवाज करू नका शेजारी वर्ग चालू आहे पण मुलं कधी कुणाचा ऐकतात का यामुळेच की काय पण जिल्हा परिषद शाळेमध्ये दोन-तीन वेळेस मधल्या सुट्ट्या दिल्या जातात,  दहा-पंधरा मिनिटा नंतर आमचा देखील शाळेची मधली सुट्टी झाली खरे पण शाळेच्या पहिल्या दिवशी पाठीत रपटा बसल्याने मी नाराज जराशा कुठल्या वेगळ्याच विचारात होतो, बाकीची मुले इतरत्र खेळत होती पण मी मात्र वर्गाच्या समोर असलेल्या पडवी मध्ये घडीव दगडाच्या चौथ्यावर उभा असलेल्या लाकडी खांबाला  उजवा खांदा लावून पूर्वेकडे तोंड करून उभा होतो, इतक्यात पाठीमागून कोणीतरी खांद्यावर हात ठेवला आणि भैय्या असा आवाज माझ्या कानावर आला तो  मी लगेच मागे वळून बघितलं तर समोर ती सकाळची सुंदर मनमोहक निरागस दिसलेली मुलगी होती, काही सेकंद तिने माझ्याकडे बघितलं आणि मी तिच्याकडे बघितलं नंतर किती वेळाने ती (माझ्या आयुष्यातील पहिलं) सॉरी म्हणाली आणि तिथून निघून तिच्या भावाला शोधत गेली, तिच्या पायातील चाळाचा घुंगरांचा आवाज आणि नजर चुकीना का असेना तिचा कानावर आलेला आवाज आजही माला आठवतो, त्यावेळी काही काळाने मी भानावर आल्यावर ते सर्व प्रकार माझ्या लक्षात आला होता, ती माझ्या मागच्या वर्गात शिकत होती आणि तिचा भाऊ तिच्या दोन वर्गाने मागं होता, ज्यावेळेस त्या मुलीने माझ्या खांद्यावर हात दिला त्यावेळी माझी पाचावर धारणा बसली होती मला त्यावेळी सुरुवातीला वाटलं  माझी बहीण आली अन् ती मला विचारेल बडबड कशाला केली किंवा गुरुजींना काहून मारलं मी आता तुझ नावाच घरी सांगते असं बरंच काहीसं... पण प्रत्यक्षात मात्र विपरीतच घडलं तसं पाहता त्यावेळी माझी बहिण आहे तिथे उपस्थित होती पण काही अंतरावर आणि हा सगळा प्रकार तिने बघितला देखील त्यावर ती म्हणाली देखील काय "बोलली ती तुझ्याबरोबर" मी म्हणालो, ती तिच्या भावाला शोधत होती, समोरून न बघताच तिने माझ्या खांद्यावर हात ठेवून माझ्याशी बोलल्यामुळे हा गोंधळ झाला होता.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू