पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

कॅन यु सेव्ह मी

कॅन, यू सेव्ह मी?

 

"गेलच पाहिजे का रे ?थांब ना अजून काही दिवस." मनातली चलबिचल चेहऱ्यावर येऊ न देता समुद्राच्या लाटांच्या तुषारने आपल्या चेहऱ्यावर आलेल्या केसांच्या बटा मागे सारत सीमाने विचारले.

"अगं भारतीय नौदलात आहे मी,  एक सैनिक म्हणून मायभूमीच्या रक्षणाची जबाबदारी माझ्यावर आहे. देश माझ्यासाठी काय करतो हे मी माझ्या मनाला विचारण्यापेक्षा मी देशासाठी काय करू शकतो याच नेहमी भान असायला हवं! 

  ". मला नाही आवडत तुझी ही सेलरची नोकरी. तु जहाजावर आरामात राहणार आणि मी इथे तुझी आठवण काढत अश्रू गाळत बसणार."

 

 " आरामात ?कुणी सांगितलं तुला जहाजावर आराम असतो म्हणून एखाद्या वेळेस समुद्राने रौद्ररूप धारण केलं की सिंहासारखी निधडी छाती असणाऱ्याचही उंदरासारखं काळीज होऊन जातं"                            चौपाटीवर बसून वाळूत कोरलेली सीमा विक्रम ही नावं कौतुकाने बघत असताना एक लाट आली आणि त्यांची लिहिलेली नाव पुसल्या गेली. सीमाच्या डोळ्यात टचकन अश्रु उभे राहिले.

         "अहं  एवढ्या तेवढ्याला डोळ्यात पाणी नाही येऊ द्यायचं ,उद्या मी परतलो नाही म्हणजे? एका सैनिकाची प्रेमिका आहेस तू, त्याला शोभेलसं वाग जरा, जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटाशी सामना करायला शिक, हार नाही मानायची कधी जीवनामध्ये."

            बाबा गेल्यानंतर आई आणि आजीच्या छत्रछायेत राहणारं आपण, आईचीही तब्येत तोळा माशाची. तिच्या समोर माझे दोनाचे चार हात  करण्याची तिची घाई. याला काय मुसाफिरासारखा फिरत राहतो.' विचार करतच सीमा घरापर्यंत पोहोचली. घराबाहेर गर्दी दिसताच,' काही अघटीत तर घडले नाही ना' या शंकेने तिचे मन धास्तावले.  समोर  आईचा मृतदेह ठेवलेला होता.

 

 "सीमा, आईने  तुझ्या नावाचा घोशा लावला होता. सकाळपासून गेलेली  ती आता दिवे लागणीला परत येतीय !"

      "आजी म्हणाली,"सीमा चल माझी मैत्रीण राहते भायखळ्याला ,तिच्या घरी जाऊन राहू." कृश झालेल्या घाटेआजीला बघून सीमाची सेवाभावी वृत्ती जागी झाली. घाटीआजीच्या  समवयस्क मैत्रिणी जमा होत असत,                          " आजी नोकरी बघायची म्हणते मी ." ‌

          "कशाला  हवी नोकरी  तुला  इथेच थांबायचयं आमच्या जवळ तू! आता आमच्यासाठी तू आणि तुझ्यासाठी आम्ही. रगड पैसा आहे माझ्याकडे काय करायचं ते इथेच कर  !"

 घाटे आजींनी मनातले बोलून दाखवलं आणि सीमा त्यांच्यात रमली. विक्रमच्या विरहाच्या  वेदना कमी झाल्या. वर्ष संपत आल वाट बघता बघता पण त्याची काही बातमी आली नाही. सीमाच्या आजीचं कॅन्सरच निदान झालं. सीमा पोरकी झाली. घाटेआजी सीमाच्या पाठीवरून हात फिरवत  म्हणाली "अगं मरण यावं म्हटलं तरी येत नाही. येऊ दे कुणाला इथे यायचं असल्यास "मायेची सावली" देऊ त्यांना." ‌                 त्या "मायेच्या सावली"त वावरताना विक्रमची आठवण काढायला वेळही मिळत नसे.

"सीमाताई कुणीतरी भेटायला आले आहे  तुम्हाला."  

 ‌           "कोण?" ‌

   " नाव नाही सांगितलं मला फक्त भेटायचं आहे म्हणाले, चांगले तंदूरस्त आहेत"

 

        " कुणाला भरती करायचा आहे स्त्री की पुरुष ? जन्मदात्या आईबापांना सांभाळायचं जीवावर येते तुम्हाला. वृद्ध निवासाची सोय आहे म्हणून ठीक नाहीतर या स्वार्थी जगात बेवारस म्हणून हाकलून दिलेल्या वृद्धांनी कुठे जावं? असे कसे निष्ठुर होता हो तुम्ही?"

येणाऱ्या व्यक्तीने विचारले," इथे बसू शकतो मी?"                          सीमाने चमकून वर बघितले,                      "  विक्रम तू ? इथे इतक्या वर्षांनी?

घरच्यांनी रवानगी केली वाटते इथे आसरा शोधत आलाय आता जीवनाच्या संध्याकाळी!"

 

"मॅडम, तुमच्या आरामाची वेळ झाली आहे , उठा बरं आता! जास्त दगदग सहन नाही होणार तुम्हाला आराम करा." सर तुम्ही ऊद्दा या, मॅडमच्या आरामाची वेळ आहे ही! .

 

    " मी जायला नाही आलोय, इथेच थांबणार आहे मी.आयुष्याचे शेवटचे चार दिवस इथेच तुझ्या सोबत राहायचंय मला शेवटच्या श्वासापर्यंत. आता तुला सोडून मी कुठेच नाही जाणार !"

 

      ‌‌   "तू आलायस म्हणून यमदुताला  थांबवू शकशील काय ,नाही ना?उद्या चार फेब्रुवारी कॅन्सर दिवस, कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जाणार आहे मी त्यांना भेटायला,मी ही पुढच्या प्रवासाला निघायचा बेत आखलाय" सीमा कसनुसं हसत म्हणाली.

 

"असं नको बोलू सीमा!"घोगऱ्या आवाजात विक्रम बोलला.

 

 "देशाचा रक्षण करणारा तु, माझं या आजारापासून रक्षण करू शकशील? माझ्या स्वतःसाठी नाही इथे येणाऱ्या प्रत्येक गरजू व्यक्तीसाठी मला जगायचं आहे, त्यांची सेवा करायची आहे," कॅन यु सेव्ह मी?"

 

"या आजाराचा अजगरी विळखा माझ्याही भोवती पडलाय सीमा!"

आणि बोलता बोलताच विक्रम खुर्चीवर कोसळला.

          " ॲम्बुलन्सला फोन लावा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायचा आहे सरांना "

 .घाबरू नकोस मी आहे तुझ्या सोबतीला. मी काळजी घेईन तुझी, तुला आजारातून बाहेर काढीन .तू फक्त या आजाराशी लढण्याची जिद्द कायम ठेव. अरे हार मानुन  चालायचं नाही. जगण्याची ऊमेदच माणसाला जगण्याचा बळ देते मी आहे ना, काहीही  होऊ देणार  तुला".

 

ॲम्बुलन्स कॅन्सर हॉस्पिटल मधे पोहचली.

 "

विक्रम ऐकतो आहेस ना तु? आधुनिक ट्रीटमेंटने आपण या आजाराशी मुकाबला करू, फक्त तू तुझ मनोधैर्य कायम ठेव."

 

 " कोशिश करने वालों की कभी हार नही होती" 

 

*********************************

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू