पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

रोज डे

                          "रोज डे"




     "नेहमीप्रमाणे आम्ही कॉलेजच्या कट्ट्यावर बसून गप्पा मारत होते. कॉलेज म्हटल्यावर प्रत्येकाचा एक सोफेस्टीकेटेड ठरलेला गृप असतो आणि त्यात एंजॉयमेंट हा ज्याचा त्याचा विरंगुळा असतो. आमच्या गृपमध्ये तशी सोफेस्टीकेटेड पोरंच होती म्हणा पण थोडी टिपिकंल...., 


टिपिकंल म्हणजे....,



१.... "विकी"....


तसा एकदम बिनधास्त पोरगा. पण पोरींच नाव काढलं की लगेच लाजाळूच्या पानांसारखा अंग आखडून घ्यायचा.... मुलींची जणू एलर्जीच त्याला.... म्हणे,"गुड फॉर नथिंग" असतात या मुली.... पण तेव्हा त्याला कुठे कळंत होतं नक्की हृदयाच्या कुठल्या पेजवर "गुड फॉर एवरीथिंग" असतात या मुली.... तो नेहमी "शाय बट टॉय" याच भूमिकेतून मुलींसमोर रहायचा.... एकदा तर सिमाने त्याला हळूच चिमटा काढला आणि गालगुच्च पण घेतला तो एवढा उडाला.... एवढा उडाला.... की तव्यातली पोळीसुद्धा फुगून लाल होईल इतका लाल झाला होता.... तेव्हापासून आम्ही सगळेजण त्याला लाल चपाती चिडवायचो.... तसा तो दिसायला हँडसम आणि हॉट हॉर्निंग होता.... एखाद्या मुलीची नजर जर त्याच्यावर खिळली तर हटायचं नाव नाही घ्यायची.... त्याक्षणी गृपमधील एकाने "ए लाल चपाती" अशी हाक त्याला दिल्यावरंच ती पोरगी चार पाऊले पुढे जाऊन मग गालात हसायची.... अशाप्रकारे त्याचा पचका झाल्यावाचून रहायचा नाही.... पण त्याला कुठे ठाऊक होतं की त्याच मुली पुढे गेल्यावर दोन क्षण का होईना पण पाहताना मनोमनी सुखावत होत्या.... हे बहुदा विकीच्या नाही तर कुणाच्याच लक्षात आलं नाही.... संभ्रमाच्या काळात वेळही निघून जात होती तोही मुलींना पाहून दिवस काढत होता आणि मुली त्याला.... हे त्याच्या नंतर लक्षात आले पण तेव्हा तो दोन मुलींचा बाप झाला होता....



२.... "सिमा"....


विकीने जेव्हा कॉलेज फेस्टीवलची पहिली हंडी एका डावात फोडली तेव्हापासून सिमाने विकीचा नंबर लावला.... पण तो डाव विकीने चुकून मारला होता म्हणा.... किंवा हयगयीत लागला होता.... आणि सिमाचा पाय घसरला.... तेवढ्यात विकी धावला आणि तिचा तोल सावरला.... दोघांच्या नजरानजर होताना आम्ही त्यांची क्रश उडवत होतो.... सिमाने तेव्हाच त्याला बातोबातोमें इशारा केला होता.... पण तो बावळंट ना....! तिच्या प्रेमाच्या हाकेला तो ओ सुद्धा देऊ शकला नसता.... बट थँक गॉड....! दिनूने त्याला हेल्प केली... सिमाला प्रपोज करण्यासाठी जे काय हवं नको ते त्याच्याकडून करवून घेतलं.... तेव्हा कुठे आपल्या शाय बट टॉयचा निभाव लागला.... सिमाचे इशारे पुरेपूर ओळखून होत तो.... पण तीच्या प्रेमाखातर त्याला हार पत्करावी लागली.... पुढे त्याने त्याचा स्वभावही बदलला.... सिमा तशी कुणाला काही पटकंन सांगणाय्रातली नव्हती.... पण म्हणतात ना,



"प्यार मे कभी कभी ऐसा है जाता है,


छोटिसी उमरमे फसाना बन जाता है।


अशातली गत....



३.... "दिनू"....


दिनू मिन्स डी.एस्.पी. #D.S.P. मिन्स (दिनेश_सिताराम_पिंगळे) DSP हा त्याचा ठरलेला लोगो आहे म्हणा... नावाप्रमाणे इतरांवर अवलंबून राहण्याची त्याची सवय.... कुरळे कुरळे केसं.... ते लांबसडक नाक.... लांबलचक कान, ते बाजूच्याने तोंडात जरी बोट घालूंन पुटपूट केलं तरीही त्याच्या कानपूर लाईन मध्ये पटकंन बजर होत असे.... अंगावर निळा पिवळा शर्ट.... आणि पायजम्याचे लोळणं.... जसा टिपिकल जून्या जमान्यातला कोणी सपोर्टिव एक्टर म्हणालात तरी हरकत नाही.... रीअल लाईफमध्ये जरी तो सपोर्टिव रोल करत असला तरीही.... आपल्या कथेत तो प्रमुख कथानकाची भूमिका करतोय हे लक्षात असुद्या.... त्याचा आवडता हिरो "मिथून चक्रवर्ती".... चालताना ही तो त्याच्याच स्टाईलप्रमाणे चालत असे.... जसा काही टांगेवाल्याने आपला टांगा थांबवून गिर्हाईक शोधत फिरतोय त्याप्रमाणे तो कॉलेजच्या आवारात फिरकायचा.... दोन तिन पोरं टोरं त्याच्या सोबतीला असायची..... लुटोचा नाद लागल्यापासून श्रेया, अमित आणि तो.... नुसते लॉटरीच्या तिकीटावर आपला दिवस कसाबसा ढकलंत होते.... पिरीअड आणि एक्झामशी त्याचा काही संबंधच नाही.... एकाला शंभर तर दुसय्राला तिनशे, आणि दिन्याला पाचशेची लॉटरी लागली तेव्हा शालिनी त्याला दिसली आणि तेव्हापासून दिन्या सरकला तो आजपर्यंत.... त्याच्या घड्याळाचा काटा जागेवरच येईना.... तो नौ दो ग्यारह झाला आणि....



४.... "शालू"....


आणि शालिनीने चित्राला खुणवले.... हा बघ तो "टांगेवाला".... त्याला ती गृहीतच धरत नव्हती.... आणि हा आपला चाललाय "बेगमकी शादिमे अब्दूल्ला दिवाना".... नुसता आपला तिच्या मागे मागे... ती नजरेवरही धरत नव्हती त्याला.... मुळात कोल्हापूरची असल्या कारणाने.... ठसकेपणा तिच्या अंगाअंगात भररेला होता.... नजर जर वळून पाहिली तर ती नावाची शालू होती.... हे दिन्याला पक्के ठाऊक होते.... पण तोही इतका बटलंर होता की तिच्या केसाच्या शेंड्याची सर नाही येणार त्याला.... शालिनी म्हणजे एक रसरसता ज्वालाच.... डोळ्यांत नेहमी तिच्या रोखून धरण्याची चाल.... एखाद्याने एकटक जरी बघितले तरी दोन कोल्हापूरी शिव्या ऐकल्याबिगार त्यो पुढं जातंच नसतोय.... आणि या बाजीरावंनबी ठरीवलंच होतं की आशीच पाहीजे आपल्याला बी.... हम भी किसीसे कम नही.... मग काय....? शालिनी पण एकदम ठसकेबाज ना.... में कोल्हापूरसे आई हूँ....!




अशा वागण्यातला दिन्या एरव्ही सेल्समन बनून फिरणारा आजकाल बाटाची चप्पल घालून फिरत होता. श्रेया तसा हुशार पण ह्या बिनडोचक्यांच्या संगतीने त्यालाही लुटो लॉटरीचा नाद लागला होता. त्याचा चित्राशी टाका भिडलेला होता. चित्राचा पहिला बॉयफ्रेंड डी.जी. (दत्ता गावडे) आता कॉलेजातल्या पोरांना जमवून लफडी वगैरे करण्यात दंग असायचा. तिने त्याला बजावले होते. कि,"अशा पोरांचा नाद करशील तर फुकाट फसशील....! मलाही विसरशील आणि दुसरीच्या नादी लागशील." तिच्या म्हणण्यासारखेच झाले. आणि इकडे श्रेयाचा जीव भांड्यात पडला. तो याच क्षणाची वाट पाहत होता. त्याला चित्राचे एक प्रकारचे आकर्षणच होते. तिने जरी तोंडावर मारल्यासारखे "नाही" म्हटले तरी श्रेयस तसा मनमिळावू स्वभावाचा तिच्या मनात बसला होता. त्यादिवशी लुटोच्या निमित्ताने का होईना पण श्रेया सगळ्यांना "मिनी बर्गर पार्टी" देणार होता. दिन्याच्या सर्व लक्षात होते. तिथे तो शालूला प्रपोज करणार होता. अमितला आणि श्रेयाला हे अगोदरपासूनच ठाऊक होते. त्यांचा प्लान बराचसा रंगला होता. चित्रालाही त्यानिमित्ताने श्रेयसशी बोलायला मिळणार होते. श्रेया दिनूबरोबर राहून आपला टाका बिडवत होता. तर तिकडून चित्राही त्याच्या इशाय्रांवर त्याच्याकडे बोलण्याच्या प्रयत्नात शालूला गुलूगुलू गोडी लावत होती. पण गोडी गुलाबीने मानणाय्रातली शालू नव्हती. आता ती वेळही जवळ येऊ लागली. फक्त दोनच घडीचा डाव होता. दिन्याने ठरविलेच होते "अरे हा तर मासा आपल्याच जाळ्यात सापडणार" त्याच्या भाषेला दुजोरा देत श्रेयाही तितकाच प्रतिसाद देत होता,"भाई! तू भीड आपण हाय ना. मग फिकीर कोणाची करतोस. ये यारी भी क्या चिज है." हाय फंडा यूज करणाय्रातला दिनू आज फक्त गुलाबजल शिंपडून घरातून बाहेर पडला. माईने विचारले, "काय रं पोरा,एवढा हासायला का लागलास. कुण्या पोरीबिरीच्या फंद्यात पडलास की काय ब्वा...? त्यावर दिन्या लाजूनच म्हणाला, "माय! आपली एकच गर्लफ्रेंड हाय. गर्ल पण एकच आणि फ्रेंड पण. लग्न करील तर तिच्याशीच न्हायतर कवारा तो अपना बाप बी नही पैदा हुआ था... ऐसा था क्या ??" तो बहुदा डायलॉग विसरला आणि माईने दोन मुस्काटात हानल्या. दिन्याने घरातून धूम ठोकली. तसा हा खोडसळंच आई बापाला एकुलता एक. मुलगीचे लग्न झाल्यावर तिला सासरी धाडली. म्हणून हा काय दिवे लावतोय तर त्याचे हे प्रताप ऐकून माईच्या काळजाचे पाणी पाणी होत होते. त्याचे बाबा सायकल रिपेअरींग वाल्याकडे पंक्चर लावायचे काम करत असे. गावी शेती ओसाड पडली होती.... धान्य पिकत नव्हते.... घरात दाणागोटा नाही.... कमवता पोसता एकटा बापमाणूस.... किती कमवून कमवणार.... हातावर आणून पानात खायचे दिवस होते त्यांचे.... माईच्या शिलाई मशीनवर तायडीचे दोनाचे चार हात केले होते त्यांनी.... लग्न करुन सुखात नांदेल पोरगी.... असे वाटले होते.... पण कुणाच्या नशिबी काय लिहीलेय हे त्या परमेश्वराशिवाय कोणाला ठाऊक असणार.... दिनूला स्वतःच्या नशिबाची काळजी वाटू लागली.... माईचे कष्ट आणि बाबांच्या जबाबदारीची त्याला आठवण झाली. दोन पैसे मिळतील या आशेने तो रोज सकाळी पेपर आणि दूधाची लाईन टाकू लागला. त्यातूनच वेळ मिळाला तर फुलेवाल्याकडे हार विकायला जायचा. त्यातलेच एक गुलाब खिशात खोचून त्याने शालिनीसाठी आणले होते.



आम्ही रोजच्या कट्ट्यावर बसून श्रेयस आणि दिनूची वाट पाहू लागलो. एव्हाना कॉलेजचा शेवटचा पिरिअड संपून सगळे आपापल्या रस्त्याला लागले होते. रिसेसमध्ये श्रेयसने सुटल्यावर पार्टीला सगळ्यांना इनव्हाईट केले होते. विकी डुलत डुलत मरगळल्यावानी मंदिराच्या दिशेने येऊ लागला. त्याच्यामागोमाग सिमा नेहमीप्रमाणे प्रफुल्लित आणि सोफेस्टिकेटेड पेहेरावात आली. चित्रा फुलाफुलांचा ड्रेस घालून ईकडून तिकडे फिरकावण्यात दंग श्रेयसला शोधू पहात होती. पण शालू मात्र ऐटित नाकाचा शेंडा वर करुन एटिट्यूड दाखवत पण चित्राच्या म्हणण्यावरुन फिकट गुलाबी रंगाच्या पंजाबी सलवारमध्ये राणीप्रमाणे शोभून दिसत होती. पार्टीबॉय श्रेया सगळा क्लासवर्क आवरुन बेत आखण्याच्या हिशोबाने मंदिराच्या कट्ट्यावर येऊन बसला. अमितने त्याला ईशारा केला आणि म्हणाला,"ये तो बघ दिन्या.... आपला दिलावर भाईजान... कॉलेजची आन बान आणि शान.... कोकणाचा किंग खान.... आणि आपल्या मित्रांची जान...." तेवढ्यात तयारीतच असलेला दिन्या सर्वांसमोर एन्ट्री मारतो. ताईने भाऊबीजेला दिलेला लाल शर्ट आणि चॉकलेटी पँट, बाटाची चप्पल घालून खिश्यातले गुलाबाचे फूल कुरवाळत म्हणाला,"ए श्रेया चल पार्टी दे, आपली पण वट हाय आणि आपण बी पार्टी देणार हाय.... सगळ्यांनी एक एक करुन रांगेत यावे आपल्याला इंग्लिश वडापावचा आस्वाद घ्यायचा आहे.... तर मंडळी एकंदर प्रवास चांगलाच झाला म्हणायचा.... आता खानपानाची व्यवस्था करावी अशी आम्ही आज्ञा देतो!" गुलाबाच्या फुलाने मुजरा करत दिन्या सूर आवळून उद्गारतो. त्याच्या थट्टा मस्करीवर सगळ्यांच्या हास्याला पारावरच उरत नाही. पण पुढे बोलायच्या आत शालूला कळते की आता याची नौटंकी चालू होणार म्हणून तिही उचल धरते,"हा गबाळ काय बडबडतै त्याची जरा चौकशी करावी म्हणते... काय तुझी भाषा....? काय ती कापडं अंगावर घातलीत....? किती एक्झॉस्टेड बोलतोस रे तू ....? त्याला काही लिमीट्स....? काही भान आहे का आपण काय बोलतोय कुठे बोलतोय....? हा जर येणार असेल तर मला पार्टी नकोय श्रेया. त्यावर श्रेयस तिची समजूत काढत,"चिल ना शालू! तो काही बोलणार नाही आणि दिन्या तू आता गप्प बस. पार्टी झाली का मग स्पीच दे तेव्हा आपण मिळून बोलू.... कसं...!!



ह्यावेळेला श्रेयसने दिन्याला डोळा मिचकावीत कसेबसे गप्प बसविले. पण गप्प बसणाय्रातला तो दिन्या कसला...? 



तो पुढे होऊन बोलू लागला,"ये है हमारे प्रिय  मित्र श्रेयस, ईनकी तरफसे आज मोहतरमाँ सबके लिए खास दावत बुलाई है."



त्यावर शालू उद्गारली "ए भैताडा तुझं खुळखूळं वाजवणं आता थांबवतोस की!" 



तेवढ्यात चित्रा तिला थांबवते,"शालू बस! तो काही वाईट बोलतोय का. अगं मस्करी केली मित्रांमध्ये तर काय झालं त्यात तुला एवढं बिघडायला. तो मित्र आहे ना मग एवढं घालून पाडून बोलायचं असतं का त्याला ??"



तिच्या सहाय्यक बोलण्यावर दान्या बोलू लागला,



"चित्राजी आप शांत हो जाईए. आपका गुस्सा जायज है. हम क्या आपकी तारीफ करे क्या उनकी बुराई करे...? हमारे लिए सबका मालिक एक है. और मलिकाए भी...?"



दिन्या सारं काही लाईटली घेत होता असे शालूला वाटले. त्यानंतर शालूचा राग शांत झाला. सगळ्यांनी पार्टी जोमात केली. श्रेयसलाही आनंद वाटला. प्रत्येकजण श्रेयसची तारीफ करत होता. अमितने श्रेयाकडून डबल पार्टी घेतली होती. कारण चित्राच्या बोलण्यावरुन त्याला स्पष्ट जाणवत होते की तिच्याकडूनही होकार आला आहे. पण दिनूच्या बाबतीत जरा वेगळेच घडत होते. अमित आणि श्रेया त्याला शालूला विचारण्यास भाग पाडत होते. पण दिन्याला धीर येईना. हातात हात घालून विकी आणि सिमा चालत होते. चित्राही डोळे मिचकावत, मान मुरडत, ठुमकत, लचकत श्रेयाच्या पावलावर ताल धरत होती. दिन्याला काही राहवेना. मनातल्या मनात दिन्या शालूला पाहून सुखावत होता. तिच्याकडे तो पाहूसुद्धा शकत नव्हता की बोलूही शकत नव्हता. पण धीर धरुन मनाला सावरुन त्याने निश्चय केला आणि एकदाचा शालूसमोर येऊन उभा राहिला. त्याने शालूची वाट अडविली. त्याला धारेवर धरणाय्रा शालूच्या डोळ्यांत तो पाहू लागला. तिच्या मदमस्त उमाळ्यांतून तो एकदम शहारुन गेला होता. तिची मादकता त्याला घायाळ करित होती. ओठांच्या पाकळ्या तिच्या सरसरु लागल्या. मनातले रानपाखरू फडफडत विव्हळू लागले. दिनूचे दोन्ही नयनचक्षू शालूच्या अधरांवरती थबकले. शालूचा आंतर्श्वास एकासारखा आतबाहेर होऊ लागला. पण तिचा तोल गेला नव्हता. लालसडक दुपट्टा तिचा वाय्रावर उडू लागला. दिनूच्या अंगाखांद्यावर खेळू लागला. हा त्या दोन प्रेमीयुगूलांच्या आयुष्यातला असा क्षण होता की ज्याक्षणी आसमंत एकाएकी बरसून चिंब भिजतानाची सर थरथरून अंगावर यावी आणि विजेच्या कडकडाटाने शालूने झटकन् दिनूच्या मिठीत यावे आणि सारा आसमंत एक व्हावा. असा क्षण डोळ्यांसमोर असताना स्वप्नात पहुडल्यासारखे एकवेळ दिनूला वाटले. पण तो भानावर आला. आता शालूही पुरेपूर शुद्धीत आली होती. शालूचा हात हातात घेत दिनूने मन अधीर करुन तिला प्रेमाची साथ दिली...,



"शालू माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. तूच माझ्या दिलाची धडकन आहेस. देहातला आत्मा, हृदयातला श्वास, माझा जीव की प्राण आहेस तू शालू.... माझे जीवन आहूस तू.... माझे मरण आहेस तू...."



"शालू...I....LOVE....YOU....!!"



शालूने मनाला सावरंत कचकन् त्याच्या कानाखाली चपराक दिली. काय होते तिच्या मनात देव जाणो. पण त्याक्षणी सारा आसमंत एकदम शांत झाला. सगळे आवाक् झाले कोणाच्याही तोंडून ब्र निघाला तर शालूशी गाठ होती. मनाच्या उंबरठ्यावर आस लावून बसलेल्या दिनूची सांजसंध्याच ढळली होती. हृदयातल्या जखमांना तो सावरु शकत नव्हता. विक्षिप्त असा एकनाद पसरला होता त्या आवारात. भर रस्त्यात शालूने दिन्याच्या प्रेमाची ऐशी तैशी करुन सोडली होती. येणाय्रा जाणाय्रांच्या नजरा दिनूच्या अवती भोवती फिरकावू लागल्या. चित्रा शालूला विचारणार तेवढ्यात शालू चिडून ताडकन् तेथून घरी निघून गेली. तेव्हापासून ती गृपमध्ये कोणाशी काहीच बोलली नाही. सगळ्यांनी आपापल्या मार्ग निवडला होता. विकी आणि सिमा इंटर्नशीपच्या परीक्षेनंतर मेडीकल जॉईंट करणार होते. अमित आय. टी. आय. ला गेला. श्रेयस एम् बी. ए. तर चित्रा घरगुती क्लासेस घेत होती आणि दिन्या.... दिन्याचा त्या दिवसापासून प्रेमावरचा भरवसाच उडाला.... आयुष्यात यापूढे कोणत्याही मुलीवर प्रेम करणार नाही असे त्याने ठरवले.... हातातले गुलाबाचे फूल त्याच्याकडे हिरमुसल्यागत पहात होते असे त्याला वाटले.... दोन क्षण आतुरतेने गुलाबाकडे पहात तो स्वतःशीच पुटपुटला...,



"तुझ्यावर भरवसा ठेवून मी आतापर्यंत आयुष्य जगत राहीलो. पण आता वळून देखिल बघणार नाही तिच्या सांजढवळ्या चेहय्राकडे. अरे....! काय समजते तरी ती काय स्वतःला. माझ्या हृदयाचे तुकडे करुन ती कोणते प्रेम मिळवू पाहतेय मी पण बघतोच....! नाय जर माझ्या प्रेमाची जाणीव तिला झाली... तर नाव नाय लावणार #DSP....!"



गुलाबकळीचा चोळामोळा करत दिन्याने कसेबसे स्वतःला सावरले. दिन्याच्या आयुष्यातला तो गुलाबी दिवस काळा ठरला होता. रागाच्या भरात तो काहीही करु शकला असता. प्रेमभंगाने खचून न जाता स्वतःच्या पायावर उभे राहण्यात जी शान आहे ती दुसय्रा कुठल्याच गोष्टीत नाही याची त्याला जाणीव झाली. आईचा लाडका दिनू आता शाहण्यासारखा वागायला लागला होता. हळूहळू का होईना पण त्याला त्याच्या परिस्थितीची जाणिव झाली. दिवसामागून दिवस जात होते पण रात्र काही सरता सरेना. दिन्या भलेही तो क्षण विसरला असेल पण मनातून शालूला काही विसरु शकत नव्हता. माई दिनूच्या भावनांवर हळूवारपणे फुंकर घालत होती. तुटलेल्या काळजातून त्याला काही हवं नको याची काळजी करत होती. दिन्याला कमवता पाहून आता तीही मनोमनी समाधानाची उब घेऊ पहात होती. संसारात कशाची नेमकी गरज असते आता दिनूला कळू लागले. बघता बघता त्याने स्वतःचे मोबाईल शॉप उघडले. सर्व काही सुरळीत चालले होते. पण दिन्याच्या डोक्यातून शालिनीचे भूत काही केल्या उतरत नव्हते.



बरेच वर्षानंतर सर्वजण एकत्र भेटले होते. तेव्हा भेटताच क्षणी गेट टूगेदर करावा अशी कल्पना विकीने दिली. सगळ्यांनी एकमेकांना कॉन्टेक्ट केले. पण शालिनीचा कॉन्टँक काही लागत नव्हता. त्याच कॉलेजच्या कट्ट्यावर जेव्हा सर्वजण भेटले तेव्हा दिन्याने सर्वांना सरप्राईज द्यायचे ठरवले. शालिनीचे आणि त्याचे लग्न झाले होते. सर्वांचा या गोष्टीवर विश्वासच बसेना. पण म्हणतात ना "दुनिया भी गोल है, जितना भी गोल घुमाओगे उतनीही करीब ले आती है ये जिंदगी". शालूला दिन्याच्या प्रेमाची जाणिव झाली होती. त्या प्रकरणानंतर दिन्याने शालूच्या मनावर एक प्रकारची जादू केली होती. भलेही सर्वांसमोर तिने दिन्याचा पाणउतारा केला असेल पण नंतर साय्रांच्या नकळत तिने त्याला भेटून त्याची शहानिशाही केली होती. घरच्यांशी बोलणी करुन लग्न जमवले. पण त्यादिवशी भर चौकात दिन्याने प्रपोज केलेले तिला मुळीच आवडले नव्हते. दिन्याने अक्कल लढवून दूसरा मार्ग काढला असता तर कदाचित शालिनी हो म्हणाली असती. हार मानणाय्रातला दिन्या तो नव्हताच. दिन्याची महबूबा आता त्याच्या बाहूत होती. त्याने प्रेमात हार मानलीही असेल पण "हारकर जीतने वालेकोही बाजीगर कहते है" हे लक्षात असूद्या. त्यादिवशी शालिनीने सर्वांसमोर दिन्याला प्रपोज केले आणि गुलाब देऊन त्याला त्याच्या गुलाबी दिवसांची आठवण करुन दिली.





                  .........The End.........





✍©प्रदीप बडदे

paddycool4india@gmail.com

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू