पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

रेड सिग्नल


                    " रेड सिग्नल "




               "बराच वेळ झाला होता. अंधारही पडत आला होता. अंधुकश्या तांबूस छटा आसमंतात  रेंगाळत होत्या. पाखरांनी घरट्याच्या वाटा धरल्या तसे गजबजलेल्या जगात क्षणात शांततेचे सावट पसरले. चहूबाजूस कोणीही दिसेना झाले. संध्याकाळचे सात वाजून गेले. तास दिड तास भर अनिकेत बसची वाटच पाहत थांबला होता. त्याला काही कारणानिमीत्त एका ठिकाणी सवलत काढून जायचे खूप दिवसांवर लांबवीले होते. साहेबरावांनी त्याच्या अभिनयाची चांगलीच दखल घेतली होती. आज वेळ असल्यास त्यांनी आवर्जून अनिकेतला बंगल्यावर खास भेटण्यासाठी बोलावले होते. त्याच्या गुणांची पारख करुनच साहेबरावांनी त्याला ही संधी देऊ केली होती. सध्या कॉलेजात छोट्या छोट्या एकांकिकांमधून तो झळकू लागला होता. त्यातच साहेबरावांची नजर ह्या नवख्या पोरावर खिळली. तो क्षण एकदम आनंदाचा होता जेव्हा अनिकेत आणि साहेबरावांची पहीलिच भेट त्याच्या फाऊंडेशनच्या स्नेहसंमेलना दरम्यान झाली होती. साहेबरावांनी चक्क पाकीट भरुन त्याला सन्मान बहाल केला. फाऊंडेशनच्या अध्यक्षांनी अनिकेतचे तोंडभरुन कौतुकही केले होते. ही संधी त्याला सहसा हातून घालवू द्यायची नव्हती. सध्याच्या अभिनयाच्या जगात तो आपले एक लहानसे स्वप्न पूर्ण करु ईच्छित होता . साहेबरावांची ओळख म्हणजे त्याच्यासाठी यशाची गुरुकिल्लीच. तो स्वप्नांच्या नगरीत स्वप्नझुल्यावर अलवार झोके घेऊ लागला. आकांक्षा, अपेक्षा साय्रा टिमटिमत्या ताय्राप्रमाणे त्याच्या वाटेवर रुळत होत्या. त्याला आता साय्रांचेच मन जिंकायचे होते....,



          शांततेत समोरच्या चौकातल्या दिव्यांची भर पडत होती. कधी हिरवा, कधी पिवळा, तर  कधी लाल आशा रंगांप्रमाणे त्याची  स्वप्ने आता रंगशलाकेत पहुडली. चौकात लाल सिग्नल लागला. चौकाच्या डाव्या बाजूने माणसांचे लोंढेच्या लोंढे रस्ता पार करु लागले. जो-तो आपल्याच तालत स्वैर पळत सुटला होता. त्यांच्या घोळक्यातून बाजू काढत, स्वत:ला सावरत, लचकत-बिचकत, चपळ पावलांनी भरधाव वेगात एक तरुणी अनिकेतच्या दिशेने येताना त्याला दिसली. तो जागीच स्तब्ध झाला. डोळ्यांच्या पापण्या मिटाता न मिटताहेत तोच त्याची नजर त्या सुंदर तरुणीवर खिळली. तो बाभड्या अवस्थेत उभा राहून पाहतंच राहीला. कोणी आपल्याला पहात तर नाहीए ना याची खात्री करुन त्याच्या नजरा पुन्हा एकदा तिच्याकडे वळल्या........,


कमनीय बांधा , लांबसडक केस, निथळ्या निभर कायेची, गव्हाळ रंग, नक्षत्रासमान पाणीदार डोळे व डांळींबी ओठ आशा तिच्या वर्णावर तो अगदी मनापासून लुब्ध झाला. स्वर्गीय दरबारात जशी अप्सरा स्वागतास सज्ज असते तसे काहीसे त्याला तिच्याकडे एकवेळ पाहून वाटले. मनातले पाखरु धडधडतेय त्याला जाणवले. कसे सावरु त्यास तोच ती त्याच्या समोरुन जाऊ लागली. तो पाहतंच उभा तिच्या कोवळ्या कायेकडे त्याला काय करावे कळेना. सहज त्याची मान खाली गेली . आशेच्या हिंदोळ्यावर झुललेल्या मनाची दुरवस्था झाली. चार पाऊले पुढे जाऊन ती तरुणी थांबली. आणि पुन्हा मागे अनिकेतच्या दिशेने येवू लागली. मागे येवून तिने अनिकेतला प्रश्न केला "एक्सक्यूझ मी! ईथून सींधी कँपला बस जाते का???"  तो क्षणात निरुत्तर झाला. तो आता टकमक दृष्टीने तीला पाहू लागला. तीने न राहवून पुन्हा एकदा विचारले "ओ हेलो! असे काय पाहताय...??? कधी पाहीलं नाहीए का कुणाला असे पाहताय...???" अनिकेत कावरा बावरा झाल्यासारखा करु लागला," अंsss! हाँ काही नाही....!" ती म्हणाली;" कुठे हरवलात? कोणाला शोधताय का?" अनिकेत मान मुरडतच बोलला "नाही..! कोणाला शोधत नाहीए..? पण सध्या शोध चालू आहे"( दबक्या स्वरात तो पुटपुटला ) तसा तीने पुन्हा क्षणभर श्वास घेतला व एका दमात म्हणाली,"मला सिंधी कँपला जयचं होत, ईथून बस मिळेल का ? केव्हापासून विचारतेय पण तुमचं काही लक्षंच दिसत नाहीए...? सांगाल का कारण तुमच्याशिवाय बसस्टँडवर मला कुणी दिसतही नाही आणि तुम्ही आहात की आपल्याच धुंदित हरवलाय? काय करायचं ? कसं होणार आजकालच्या तरुण पिढीचं? हे असेे पाडलेले चेहरे पाहून शहरात राहणेच मुळात मुश्कील झालेय बाई....!


इंन्टरनेटवर सर्च करुन तीने बसचा पत्ता लावला. ती वाट पाहतेय न पाहतेय तोवर ती बस पुढ्यात येऊन उभी राहीली . तिच्या जीवात जीव आला. तिने बसमध्ये चढताना अनिकेतला विचारले "तुम्हाला कुठे जायचं होतं ?" बस पुढे जाऊ लागली. त्यानंतर अनिकेतच्या लक्षात आले की अपल्याला पण याच बसमध्ये साहेबरावांना भेटायला जायचे होते. तो श्वास घेतो न घेतो तोच पळू लागला आणि मास्तरला हाक देऊ लागला " मास्तर थांबवा मला अर्जंट मिटींगसाठी जायचे होते, आहो थांबवा ......थांबवा......!



तात्पर्य: ईथे दृष्यात आपण जे पाहतो ते सर्व काही मृगजळ आहे. कलियुगात कोणीही कोणासाठी थांबत नसतो जो तो आपल्याला मिळेल त्या मार्गाने पुढे निघून जातो. त्यामुळे कोणाची वाट पाहण्यात वेळ वाया घालवू नये.




✍©प्रदीप बडदे,

paddycool4india@gmail.con

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू