पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मराठी गौरव गीत


हे मराठी माय माझे मी तुझा गे बाळ आहे
माय तुझिया स्पंदनांशी जुळली माझी नाळ आहे ।।

माऊली तू ज्ञानियाची नामयाची अन तुक्याची
रम्य हा इतिहास आणि भावी उज्वल काळ आहे ।।

नाथ, चोखा,सावत्याची आणि जनीची माय तू
तू विठूच्या राउळातिल नादमधुरा टाळ आहे ।।

तूच वाणी पंडितांची, शाहिरांची अन कविंची
तू समर्थ्यांची खनी अन भारतीचे भाळ आहे ll

तू शिवाजीची भवानी लक्ष्मीचे त्या तेज तू
प्रेरणा क्रांतीविरांची दुष्मनांची काळ आहे ।।

भाग्य अमुचे थोर मधुर तव स्तन्य आम्हा लाभले
शब्द शब्द तुझिया मुखीचा बघ किती वेल्हाळ आहे ।।

ह्या जगी असतील कितिही आणखी भगिनी तुझ्या
तूच अमुची धारिणी अन तू आम्हा आभाळ आहे ।।

कवी -- अनिल शेंडे।

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू