पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मराठी भाषा दिवस

मराठी भाषा दिवस 




 ‌    "लाभले आम्हास भाग्य बोलतो 

मराठी,                                जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

       धर्मपंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी "

कवी सुरेश भटांनी आपल्या काव्यात आपल्या मराठी भाषेची महती किती सुंदर शब्दात व्यक्त केलेली आहे आणि ती अगदी सार्थ आहे. आपल्या भाषेतूनच  आपल्याला आपल्या संस्कृतीची व आपली ओळख होते. आपल्या मातृभाषेतून  आपले आचार विचार जेवढे आपल्या मनापर्यंत पोहोचतात तेवढे इतर भाषेतील नाहीत आणि ते आचार विचार आपल्याला स्पष्टपणे समजले तर तर ते आपण इतर भाषेमध्ये दुसऱ्यांना पटवून देऊ शकतो. माणसाच्या कुटुंबामध्ये बोलली जाणारी भाषा म्हणजे मातृभाषा. म्हणजे जन्मापासून ज्या भाषेचा आपण वापर करतो ती.

 

            मराठी भाषा ही आपल्या भारताच्या प्राचीन भाषा पैकी एक आहे. एकेकाळी ही लिपी मोडी भाषेत लिहिल्या जात होती पण आता जी लिपी आपण वापरतो तिला देवनागरी लिपी असे म्हणतात.

मराठी भाषेचा उगम साधारण 11 व्या शतकात झालेला आहेअसं वाचनात आलं.  मुकुंदरांनी विवेक सिंधू हा ग्रंथ  पहिल्यांदा लिहिला होता .म्हणजे ही भाषा फक्त बोलली जात नव्हती तर ती लिहिण्यासाठीही वापर होत होता. एकविसाव्या शतकात महानुभावांचे ग्रंथ,  ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी त्यानंतर संत वा:डमय ,निरनिराळे ग्रंथ आपल्या मराठी भाषेच्या अस्तित्वाची, तिच्या सुख-समृद्धीची जाणीव करून देतात. अनेक शिलालेख, ताम्रपट, आज्ञापत्रे बखर, तहनामे, राजीनामे वगैरे  मराठी भाषेत लिहिलेली साधने  आपल्या मराठीच्या इतिहासाची साक्ष देणारे ठरतात. मराठीला खरे वैभव झाले ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीत.                       महाराष्ट्रात बाराकोसावर म्हणजे साधारण पंचवीस किलोमीटर नंतर मराठी भाषेत बदल दिसून येतो. बदलल्या जाणाऱ्या भाषेचे स्वरूप वेगवेगळे, बोलण्याची  ढब , शब्द वेगवेगळे आढळून येतात. एकच वस्तू वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते.  आपण ज्या वस्तूचे नाव सांगितले ते समोरच्याला ध्यानात येत नाही कारण त्या वस्तूच्या नावा करता ते लोक वेगळा शब्द वापरत असतात. प्रत्येकाला आपली मायबोली असलेल्या मराठी भाषेचा अभिमान असतो मग तो वर्हाडातील वऱ्हाडी भाषा बोलणारा असो की कोकणातला कोकणी भाषा बोलणारा, खानदेशातील अहिराणी भाषा बोलणारा असो की झाडीपट्टीतील  मराठी बोली.. सगळ्यांच्या बोलण्यात वेगळीच  लकब दिसून येते आणि त्याच्या त्या बोलण्याच्या पद्धतीने हा महाराष्ट्रातील कुठल्या भागात राहणारा आहे हे सहजरित्या ओळखायला येते.

         ज्ञानेश्वर संत तुकाराम नामदेव मुक्ताबाई यांचे अभंग ,जीवन जगत असताना समाज प्रबोधनाचे कार्य करत असतात. तर कवी कुसुमाग्रज पु. ल देशपांडे ,ना.सि. फडके असे अनेक मराठी लेखक व लेखिका, बहिणाबाई सारख्या कवयित्री यांनी मराठी वाङ्मयाला समृद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवलेले आहे . मराठी भाषेतले ग्रंथ ते मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या  कीर्तीचा इतिहास असो की संभाजी महाराजांच्या देशभक्तीचा.आपल्या मराठी मातृभाषेत तो इतिहास वाचताना गौरव अनुभवता येतो.

 

        मराठी भाषेतील बालकविता हा तर तिन्ही पिढीतला लोकप्रिय प्रकार आहे. तसेच मराठीतील म्हणी, कीर्तन, उखाणे, भजन, पोवाडे, लावण्या ,नाटके इत्यादी विविध प्रकार आपल्या या मराठीतच ऐकायला वाचायला मिळतात.आईच्या मांडीवर बसून घास भरवताना आई त्याला 'काऊ' दाखवत घास देते, पण पुढे बाळ इंग्रजी माध्यमात शिकायला  गेलं की त्याला "काऊ" चा अर्थ गाय असा समजविला जातो आणि ते बाळ संभ्रमात पडते की आईने दाखवलेला तो काळा रंगाचा पक्षी म्हणजे काऊ की पुस्तकातल्या चित्रात दाखवलेली गाय म्हणजे काऊ..                  मराठी भाषेची एक खासियत अशी ही आहे की  वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. कोकणात कोकणी तर वऱ्हाडात वऱ्हाडी, कोळी दक्षिणी, हळवी, वाढवळी, मालवणी अहिराणी,आदि बोली बोलल्या जाते.ही मराठी बोली कधी रूक्ष तर कधी येईल  हेलकावे देऊन, तर कधी मृदू स्वरूपात बोलल्या जाते.

तसेच या भाषेमध्ये द्विअर्थी शब्द पण  भरपूर आहेत. चाल म्हणजे चालणे.. एखाद्या गाण्याला लयबद्ध करतो त्यालाही  चाल  म्हटलं जातं.

 

मराठी भाषा विविध रंगाने विविध रंगाने, विविध अंगाने, विविध रूपाने नटलेली  आहे.काना, मात्रा, वेलांटी, अनुस्वार, स्वल्पविराम, अल्पविराम, अवतरण चिन्ह ,इत्यादी अलंकारचा साज चढवून दिमाखात ही माय मराठी अवतरीत होते.  एखादा जरी काना, मात्रा मध्ये चूक झाली की त्याचा लगेच अर्थ बदलून जातो. ' दिन' म्हणजे दिवस, आणि,'दीन' म्हणजे दुबळा अशा प्रकारचा त्याचा अर्थ समजला जातो.

    अशी ही मराठी भाषेची थोरवी. या मराठी भाषेला वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांनी दर्जा दिला म्हणून 27 फरवरी हा दिवस कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केल्या जातो. 

आपली ही मराठी भाषा भारताबाहेर अमेरिका ,इस्त्राईल ,कॅनडा पाकिस्तान इत्यादी देशात बोलली जाते. जगभरात बोलल्या जाणाऱ्या एकूण भाषांपैकी आपली मराठी भाषा ही पंधराव्या नंबरवर आहे.  आपल्या देशामध्ये प्रामुख्याने एकूण चार ठिकाणी मराठी भाषेचा वापर होतो. महाराष्ट्र व गोवा राज्य तसेच  दिव-दमन,  दादरा-हवेली या केंद्रशासित प्रदेशात मराठी भाषेला अधिकृत दर्जा देण्यात आलेला असून ही राजभाषा म्हणुन  ओळखले जाते.

मराठी भाषेचे अनेक शब्दकोश आहेत. आपण त्या शब्दकोशातत पाहिले तर एका शब्दाचे कितीतरी अर्थ किती शब्द तयार झालेले आपल्याला वाचायला मिळतील आणि आपल्या  ज्ञान भंडारात वाढ होईल. ज्यांचे शिक्षण मराठी भाषेतून झालेली आहे, त्यांना तर आपल्या मराठी वा:गमयाचा खजिना उपलब्ध आहे. "वाचाल तर वाचाल"या उक्तीप्रमाणे आपण वाचनाची आवड कायम ठेवली पाहिजे आणि तेही आपल्या मातृभाषेतून. आपल्या पुढच्या पिढीलाही मातृभाषा हा विषय शाळेत असला पाहिजे. त्यांना आपल्या मराठी संस्कृतीची ओळख होऊ शकेल. त्यांच्या ज्ञान भंडारात अनमोल अशा शाब्दिक रत्नांची भार पडेल. सध्या  काही शाळांमधून मराठी विषयाची सक्ती केलेली आहे  ही आनंदाची व समाधानाची गोष्ट आहे. त्यामुळे मराठी भाषा विस्मृतीत जाणार नाही याची खात्री वाटते. बऱ्याचदा मुलांना बाहेर बाजारात नेल्यानंतर मराठीतील दुकानाच्या पाट्या वाचता येत नाही. आजही काही प्रांतामध्ये काही देशांमध्ये त्यांच्यात भाषेतून व्यवहार होतो. तेव्हा आपणही  आपल्या मराठीचा अभिमान बाळगाला हवा आणि मराठीतूनच बोलायला हवे व्यवहार करायला हवा.

शिक्षण जेव्हा मातृभाषेतून शिकवले जाते  तेव्हा ही मातृभाषा थेट माणसाच्या  मन आत्मसात करून घेते. या भाषेतूनच आपली प्रांतीय सभ्यता ,संस्कृती योग्य प्रकारे समजविल्या जाते.

 " इथल्या दिशा दिशात दाटते मराठी  ‌इथल्या नसानसात गर्जते मराठी, आमच्या मुला मुलीत खेळते मराठी रोप त्या कळी कळीत लाजते मराठी .."

* माझी माय मराठी*






पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू