पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

तोच सृष्टीचा मैतर

आला वसंत बहार 

सांगे आंब्याचा मोहर

वृक्ष-लता वर आली

        पाने फुले मनोहर॥धृ॥

 

ऐका अधून मधून 

कोकिळेचे मधुस्वर

माघ फाल्गुना आधीच 

   झाला चैत्र का अधीर॥१॥

 

चित्र रेखिले सृष्टीने

पहा किती हे सुंदर 

स्वर्ग असेल कोठला

        काय याहून सुंदर॥२॥

 

पाखरांचा गुंजारव

ऐका फांदी -फांदीवर

नव वर्षाचे स्वागत 

       हेच असे खरोखर॥३॥

 

सृष्टी उभविते गुढी

जणू वसंता खातर

करी सृष्टीचे जतन

         तोच सृष्टीचा मैतर॥४॥

 

*-- निसर्गसखी सौ मंगला मधुकर रोकडे.*

*शब्दसृष्टी*,

प्लाॅट नं ७अ, नारायण नगर,

धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव. 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू