पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

गुलाबाचा राजा

गुलाब…..

 

आवडतो मज गुलाब काळा , लाल चुटुक अन् निळा जांभळा …….

लाल गुलाबाची तर बातच न्यारी रूप दिसता त्याचे, प्रीती फुटे अंतरी

 

 गडद केशरी पिवळा अन मोतिया मोहवी रंग तयाचे ,वेड लावी जीवा……

 

 आवडे मज गुलाब तो अबोली मुग्ध ,अबोल भासे त्याची बोली…… 

 

  गुलाबी गुलाब तर वाटे अती भारी 

मंद सुगंधाची "कुपी" असे त्याचे अंतरी…..

 

 नजर पडता त्या गुलाबावर " मरुन "

 वाटे तप्त ज्वालांनी करपुनी निघाले तयाचे जीवन…...

 

आवडे जयांस तो गुलाब "शुभ्र"

 मनही असेल तयाचे शुद्ध निरभ्र…

 

नवतारुण्याचा ओठी ठेवुनिया आब

 फुलुनी येतो तो गर्द गुलाबी गुलाब…

 

गर्द हिरव्या पाकळ्यांचा बघुनी गुलाब हिरवा..

आठवे मज तो श्रावण मासिचा ऋतू हिरवा, ऋतु बरवा...

 

   विविध रूपे तुझी अन असती विविध रंग काट्यात फुलुनीही , सदैव देत असे तू आम्हा सुगंध….

 

रुप तुझे ते मोहक अन् रंगाचा असे गाजावाजा

 म्हणुनच या जगी मिरविसी होउन तु "फुलांचा राजा "…...

 

  * ज्योतिर्मयी…*

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू