पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

महिला दिनानिमित्त

*महिलादिन-विशेष*



मातृरुप तू शक्तीरुप तू

जगद्वंद्य माते,

भगिनीरुप तू लेऊनी आली

सदैव जी स्मरते।


पत्नीरुप तू, तू ही कन्या

अगणित तव रुपे,

जेजे उत्तम उदात्त उन्नत

सकल तवठाई दिसते।


अशी दिव्य तू महन्मधुर अन्

दीपज्योत ती जणु,

माऊली कन्या पत्नी वा तुज

भगिनी मैत्रिण म्हणु।


अनंतरुपे सदा सुखविशी

जगात या मजला,

महिलादिन हा आज उगवता

करु वंदन गे तुजला।


शुभेच्छाच त्या सदैव असती

पवित्र मंगल देवी,

अगाध माया अशी तुझी ही

पुरस्कार जणु दैवी।



©️ डाॅ.श्रीकांत औटी

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू