पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

ती

*'ती'*

  *- हासरा चंद्र*

 

खरंच 'ती' काय असते?

ती एक अजब रसायन असते;

जे कधीही विरल होऊ शकतं

कधीही अविरल होऊ शकतं. 


आधारालाही आधार देणारी 

वसुंधरा 'ती'च तर असते.

देवांनाही अजेय असुरांना

मारून जग चालवत असते. 


ती क्षणात रडते, क्षणात हसते. 

कणाकणाचे आणि क्षणाक्षणाचे

महत्त्व 'ती'च तर जाणत असते.

अन विसरून सारे हसत असते. 


चुकलेल्या आपल्याला रागावून

ती वठणीवर आणत असते.

नावेतल्या प्रवाशाला हात धरून

ती नीट जागेवर बसवत असते. 


ती छानच असते अगदी परीसारखी

ती खरंच असते अस्सल रत्नपारखी, 

ती सूर्य सांभाळणाऱ्या प्राचीसारखी

ती मंद मंद हसणाऱ्या कळीसारखी. 


ती कान्हाला आदेश देते खुशाल

ती चन्द्राला खुणावणारी मशाल

ती मुखावर हास्य खुलविते विशाल

तिच्या समोर आपली काय बिशाद! 


 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू