पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

काळीकुंतल पहाट

काळी कुंतल पहाट


काळ्या कुंतल पहाटे

मनी नाचतो मयुर,

जसा नाचे वनामध्ये

पक्षीराज तो सुंदर।


आली पहाट पहाट

दारी मोगरा गं फुले,

नका तोडु कलिकांना 

असती नवजात ती मुले।


गोठ्यातुनी हाळी येई

धेनू हंबरे हंबरे,

आणा चला पटकन

तिची गोजिरी लेकरे।


पाझरीते धेनू पान्हा

मुखी पाडसाच्या जाई,

मला आठवे ती बघना

प्रेमळ ती माझी आई!


काळ्या कुंतल पहाटे

कसा डोकवी तो अर्क,

नगावरी कनकाचे 

ऊधळितो बघा वर्ख।


येई दुरुनी तो बघना

मनमोही गंध-ग॔ध,

सुवासाने पुष्पांच्या त्या

जाहले मी मनी धुंद।


चला आता बसु सगळे

करु योगाच्या आसना,

निरोगी ती काया राहो

मनी ही च गं कामना।


©️ डाॅ.श्रीकांत औटी

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू