पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सण करा नाविन्याचा

आम्हा महिलांचा आला
दिन मान सन्मानाचा
नित्य हवा आम्हा दिन
असा मान सन्मानाचा॥धृ॥


हक्क दिधला आम्हास
जोति-साऊंनी ज्ञानाचा
एक मानव म्हणूनी
तसा मिळावा मानाचा॥१॥


आधी आला होलिकेचा
स्वाहा होळीत होण्याचा
सत्य असो की रचित
होलिकेत जळण्याचा॥२॥


गेले जोतिबा देऊन
वसा सत्य शोधण्याचा
पर्यावरण रक्षण
दिन आले करण्याचा॥३॥


जाती-भेद अभेद ही
आधी हिला जाळण्याचा
अंधश्रद्धा अंधःकार
सण करा जाळण्याचा॥४॥


असा करा बांधवांनो
सण नवा नविन्याचा
तुम्हापरी आम्हासही
मानवच मानण्याचा॥५॥

 


*--निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.*
*शब्दसृष्टी*, प्लाॅट नं. ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू