पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सृष्टि सावरेल आम्हा

करा अनिष्ट रुढींचे
येत्या होळीत दहन
प्रश्न जटिल अति हा
झाला पहा रे गहन॥धृ॥


पाला पाचोळ्याचे करा
अन् होळीत दहन
पर्यावरण रक्षण
प्रश्न अति हा गहन॥१॥


करा सृष्टीचे जतन
पराकोटी करा यत्न
व्यर्थ जाणार ना पहा
सारे कलेले प्रयत्न॥२॥


*सृष्टी* आम्हा साठी हेच
खरे अनमोल रत्न
करा जतन अन्यथा
सारे होईल पतन॥३॥


हात जोडून करिते
पहा मंगला कथन
सृष्टी सावरेल आम्हा
तिचे थांबवा रुदन॥४॥


*--निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.*
*शब्दसृष्टी*, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू