पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

या सुंदर वेळी......

या सुंदर वेळी......
हसरा चंद्र (चंद्रहास सोनपेठकर)


वसंतातही कधी येतो
पाऊस आठवांचा अवचित.
मृद्गंधाचाही धूप होतो
मोहोराच्या गंधाला लाजवित.


या सुंदर वेळी वेल डोलते
आंब्याच्या डहाळीवर जेव्हा. 
हिंदोळा जणु घेते राधिका
सोबतीस असतो कान्हा तेव्हा. 


मंथर वारा मनीचे गूज सांगतो
इतकेच मागणे सखयां मागतो. 
तव पाव्यामधून जाऊ दे मला
कान्हा, तुझा सूर होऊ दे मला.


अंबरात सौदामिनी चमकते
प्रियेची दंतावली चकाकते.
तिचे भाबडे डोळे पाहून  
कृष्णाची नजर एकवटते.


बरसान्याच्या दुहितेला पाहून
पाऊसही बरसणे विसरतो.
मनमोर मात्र पिसारा फुलवून
पुन्हा त्या पावसाला बोलावतो.


पाऊसही स्वीकारतो आमंत्रण 
मग बहरून जातं ते वृंदावन.
प्रत्येकाच्या आठवणीत असतं
आपलं आपलं एक निधीवन.

 

(दि. १५ मार्च २०२३ रोजीच्या संध्याकाळी पाऊस पडत असताना सुचलेले काव्य)

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू