पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

शॉपिजेन: रचनाकारांच्या हक्काचं व्यासपीठ डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर

शॉपिजेन: रचनाकारांच्या हक्काचं व्यासपीठ

डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर

 

        शॉपिजेन परिवारातील ज्येष्ठ लेखक आदरणीय श्री. नागेश शेवाळकर यांच्यामुळे खरं तर माझा आणि शॉपिजेन प्रकाशनाचा संबंध आला. त्यांनी मला या प्रकाशनाविषयी माहिती दिली. या पूर्वी माझी १२ पुस्तकं विविध प्रकाशकांनी केली होती. मात्र शेवाळकर सरांनी मला शॉपिजेनकडून पुस्तकं करण्याविषयी सांगितले.

        ऑक्टोबर २०२१ ते मार्च २०२३ या कालावधीत माझी पाच पुस्तकं शॉपिजेन प्रकाशनातर्फे प्रकाशित झाली. आणखी काही पुस्तकं प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.

        अगदी प्रांजळपणे हे नमूद केलं पाहिजे की, माझ्याकडून जे इतकं सातत्यपूर्ण लेखन झालं, यामागे निश्चितपणे भगवंतांची योजना आहे.

आपुलिया बळे नाही मी बोलत । सखा कृपावंत वाचा त्याची ।।

साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी । शिकविता धनी वेगळाची ।।

काय म्यां पामरें बोलावी उत्तरे । परि त्या विश्वंभर बोलविले ।।

तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा । वागवी पांगुळा पायाविण ।।

मात्र कोणतेही कार्य पार पाडताना भगवंत एक निमित्त कारण आपल्यासमोर उपस्थित करतात. ही भूमिका शॉपिजेन प्रकाशनाकडून चोखपणे बजावली जाते.

        शॉपिजेन प्रकाशनाची संकल्पना खूप छान आहे. पुस्तक प्रकाशित केले जाते, त्यात मागणी प्रमाणे मुद्रणाची सोय आहे. तसेच पुस्तक Amezon इत्यादी वेबसाईटवर देखील विक्रीस उपलब्ध असते. मराठी वेबदुनिया आणि समाज माध्यमांच्या वेबसाईटवर पुस्तकाची जाहिरात केली जाते. १० – १२ दिवसांत मागणीकर्त्याला पुस्तक मिळते, असा माझा अनुभव आहे. लेखकाला Royalty देखील देण्यात येते.

        याठिकाणी एक महत्वाची गोष्ट नमूद करावीशी वाटते, ते म्हणजे शॉपिजेन टीमकडून लेखकाला मिळणारे प्रोत्साहन आणि प्रेरणा. शॉपिजेनच्या मराठी विभागाची धुरा सांभाळणाऱ्या माननीय ऋचा करपे Madam यांच्या ठिकाणी असणाऱ्या ऋजुता, मृदुता, विनम्रता, तत्परता, लेखकाचे म्हणणे ऐकून घेण्याचा संयम यांचा प्रत्यय नेहमी येतो. कोणतेही पुस्तक अधिकाधिक सुबक आणि सुंदर कसे होईल, यासाठी त्या नेहमी प्रयत्नशील असतात. तसे मार्गदर्शन लेखकांना करतात.

        मला आठवतंय नोव्हेंबर २०२२ चा पहिला आठवडा होता. प्रवास लेखनाविषयी ऋचा Madam चा मला फोन आला. मी प्रवासात होतो. आणि त्यांना लेखन कमी कालावधीत हवे होते. प्रवासात असल्याने कवरेज व्यवस्थित नव्हते. मी त्यांना WhatsApp वर लेखन आणि फोटो पाठवले. त्यांनी ते वेबसाईटवर प्रकाशित केले.  अशा प्रकारे त्यांचे छान सहकार्य लाभते म्हणून आपल्याला लेखनासाठी सकारात्मक उर्जा मिळते.

        माझा आणि त्यांचा संवाद फोनपेक्षा WhatsApp वरच अधिक होतो. कारण WhatsApp वरील संवाद हा मुद्रित स्वरूपात असल्याने त्यात सुस्पष्टता असते, असे माझे मत आहे.

        कोणत्याही पुस्तकामागे ऋचा Madam या dedicated असतात. प्रचंड परिश्रम शॉपिजेन टीमकडून घेतले जातात. प्रकाशक आणि रचनाकार यांच्यांत सुसंवाद असला की, त्या सुसंवादाचे प्रतिबिंब पुस्तकात उमटते, असे माझे मत अनेक वर्षांच्या लेखन-अनुभवानंतर झाले आहे.

        शॉपिजेनकडून दि. ७ ऑक्टोबर २०२१ रोजी “नित्यपाठासाठी सार्थ श्रीदेवीस्तोत्रे”, दि. ८ एप्रिल २०२२ रोजी “श्रीरेणुकाशरणम्”, दि. १० मे २०२२ रोजी “नीतिशतक निरूपण”, दि. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी “चंद्रामृत भाग १” आणि दि. ४ मार्च २०२३ रोजी “चंद्रामृत भाग १” अशी पाच पुस्तके POD स्वरूपात प्रकाशित झाली आहेत. भगवंतांच्या कृपेने अजूनही अनेक महत्वपूर्ण पुस्तके शॉपिजेनकडून प्रकाशित करण्याचा मानस आहे.

        शॉपिजेनकडून प्रकाशित झालेल्या काही लेखकांच्या पुस्तकासाठी प्रास्ताविक लिहिण्याचाही योग आला. आपण पुस्तक लिहायचे आणि नंतर प्रकाशकांना शोधायचे असा भाग आता नाही. कवी, कथाकार, लेखक अशा सर्व प्रकारातील साहित्य रचनाकारांसाठी शॉपिजेन प्रकाशन हे खरोखर एक हक्काचे व्यासपीठ आहे. मी परिचयातील साहित्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्वांना शॉपिजेनविषयी आवर्जून सांगतो. शॉपिजेन परिवाराची भरभराट व्हावी, नवनवीन लेखक, कवी यांनी या व्यासपिठासमवेत कार्य करावे. अशी शुभाकांक्षा जगदंबेच्या चरणी व्यक्त करून हा प्रांजळ कृतज्ञता व्यक्त करणारा लेख इथे पूर्ण करतो.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू