पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सावली

*सावली*

*कवीः हासरा चंद्र* (चंद्रहास सोनपेठकर)

 

कातरवेळी सावली अशी दिसली कशी

सजणी दारी ऊभी तरी बोलली कशी

 

सावली ती हसली रुसली मुसमुसली 

लाडी गोडी काॅफी तरीही रुसरुसली

 

रुसली तरी बोलली बोलली तरी रुसली

हसली तरी रुसली रुसली तरी हसली

 

सावली ती एकली खांबासी ऐसी टेकली

गोडी ती बरसली स्मरणी किणकिणली

 

ती वदली रसरसली फुलली हलली पिसारली

अंतरी हृदयी भरली भारली रमली सामावली

 

(या कवितेचे वैशिष्ट्य असे की, या कवितेतील प्रत्येक शब्द *ईकारांत* आहे.)

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू