पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

शेगाव ट्रिप विथ लवली लेडीज

        " शेगाव  ट्रिप विथ लवली लेडीज "

               "एक विलक्षण आठवण "



16 डिसेंबर 2022 सकाळी.
ट्रिंग ट्रिंग फोन रिंग वाजली.
ट्रीपची तयारी झाली का! असं मला फोन आला.
आणि मीही म्हटलं  ' हो ' काकू, माझी बॅग, नेहमीच तयार असते.  डोन्ट वरी.
तुम्हीच सर्वांनी न विसरता आपल्या बॅगामध्ये मोजकेच 2 दिवसाचे अंगावर घालण्याचे कपडे,
स्वेटर थंडीचे , पांघरून, पाणी बॉटल सोबत औषध, गोळया घ्या प्लीज.
आमची ट्रेन दि.16 डिसेंबर.22
रात्री 9.50 pm
शालिमार एक्सप्रेस.
कल्याण ते शेगाव होती.
सगळ्यांना डायरेक्ट  अर्धा तासा पूर्वी भेटण्याच ठरलं होतं. त्या प्रमाणे सर्वजणी एकत्र कल्याण स्टेशन ला आल्या.
माझ्या साठी एक अविस्मरणीय ट्रिप होती.
कारण आमच्या "शेगाव " ट्रिप मध्ये सर्वजनी "फ्रेंड्स फॉरेव्हर ग्रुप डोंबिवली '  मधील यंग लविंग लेडीज होत्या. सर्वच जणी  (सिनियर सिटीझन )साठीच्या पुढे असून ही तरुणाईला लाजवतील अशी ऊर्जा बाळगून होत्या.
म्हणूनच त्यांना यंग लविंग लेडीज म्हणतो.
मला त्यांना सांभाळून ट्रिप ला घेऊन जायचं होतं पण उलट त्याच मला छान सांभाळून घेत मदत करत होत्या. हे कोतुकच.
आमचा ग्रुप 8 जणांचा व 2 दिवसाच्या ट्रिपला शेगाव  "श्री गजानन महाराज "यांच्या दर्शनाला निघाला होता. या ट्रिप मध्ये. माझ्या सोबत जेष्ठ यंग लेडीस सौ. वंदना डोरुगडे, सौ. अर्चना बिडवी, सौ. श्यामला देशपांडे,  सुनंदा रनवरे, रोहिणी गोळे, सुनंदा भगत  होत्या.
सोबत  स्नेहल मोहिते ऐरोली, ही देखील अचानक या ग्रुप ला जॉईन झाली.
संध्याकाळी भर गर्दीत कल्याण ला  माझ्या सासूबाई सुनंदा भगत ( सिनियर सिटीझन )यांना सोबत घेऊन वेळेत पोहचायचे होते. म्हणून मीही थोडं टेन्शन घेतलं होतं.
मुंबई मध्ये रात्री ट्रेन चा प्रवास म्हणजे फार मोठं दिव्य असतं. भयानक गर्दी बघून पोटात गोळा येतो. शेवटी मला माझ्या बायको वृषालीने लवकरच 8.38 pm AC ट्रेन आहे तीने जा असा सल्ला दिला. आणि मीही तसेच केले.


AC ट्रेन ला तिकीट तीनपट म्हणजे विक्रोळी ते कल्याण सिंगल ₹95 रुपये होते. ते पटकन घेतले व निघालो. आम्ही वेळेपूर्वी पोहचलो आणि सगळ्यांना एकत्र ट्रेन येण्यापूर्वी भेटलो.
ट्रेन प्लॅटफॉर्म नं.5 वर 9.55 pm आली आम्ही लगबगिने कसेबसे आमच्या बोगीत s7,  s8, s4 असे चढलो. सर्वांना मी जागेवर सेट करून दुसऱ्या s4 मध्ये गेलो.
ट्रेन सकाळी 20 मिनिट उशिरा पोहचली.
7.30 ला आम्ही शेगाव रेल्वे स्टेशनला उतरलो.
बाहेर पडताच समोर " शेगाव संस्थांन ची भक्त निवास "ला जाण्यासाठी बस उभी होती.
आम्ही मोफत बस समोर असतांना देखील बसला गर्दी बघून लोकल ऑटो 10रुपये शेअर प्रमाणे रुपये 80/ देऊन 'भक्त निवास ' येथे पोहचलो. उशीर झाल्यामुळे आम्हाला रूम नाहीत असे तिथे कळाले. तिथल्याच एका सेवेकरीने सांगितले आनंद विहार, आनंद विसावा येथे रूम मिळेल जा.
त्याप्रमाणे आम्ही ' भक्त निवास च्या बसला रांग लावून आनंद विहार ला गेलो, मी एकटाच रूम ची चॊकशी करायला म्हणून उतरलो, चोकशी कक्षत ac रूम मिळतील पण तासभर लागेल असे कळाले. मी  त्यावेळी गोळेकाकूंना फोन केला तर त्या म्हणाल्या आम्ही बसने पुढे आनंद विसावा ला आलोय.
अरे देवा, म्हनत मी काकींना तिथेच रूम मिळेल का विचारून सांगा म्हटलं. तेही मिळेल म्हणाल्या व लगेच मी जाऊन रूम साठी रांग लावली. साधारण 2-3 तासानंतर आम्हाला 2 रूम 20 नं व 22 नं. मिळाल्या. सगळेच रूमवर पोहोचलो. दमल्या मुळे सर्वांना भूक ही लागली होती. मी रांगेत असतांना त्यांनी संस्थांन च्या कँटीनमध्ये साबुदाणा खिचडी व उपमा, चहा असा नास्ता केला होता. मीच गडबडीत काही खाल्लं नाही.


रूम नं 20 मध्ये 4 . रूम 22 मध्ये 4. चाव्या घेऊन सगळ्यांनी प्रवेश केला.
स्वच्छ व सुंदर 4 बेड च्या रूम पाहून सर्व खूष झाले. काही वेळाने सर्व आंघोळ करून फ्रेश झाले. लगेचच  "नागझरी " व जवळच्या 5 दर्शनस्तळं या साठी गाडी शोधायला मी आनंद विसावा च्या गेटवर आलो. गेट वरून 2 ऑटो बुक करून शेगाव पासून 8 km वरील नागझरी, व जवळील 5 दर्शनस्थळ पाहायचं फायनल केलं आणि लगेचच साधारण 11.30 ला निघालो.
प्रथम आम्ही नागझरी ला निघालो. नागझरी म्हणजे श्री संत गोमाजी महाराज मंदिर.  श्री गजानन महाराज यांचे ते गुरुदेव आहेत. त्यामुळे गुरुचें दर्शन करून आम्ही  श्री.गजानन महाराजांचे दर्शन करायचे असे ठरवलं. अतिशय सुंदर प्रवेश द्वार. मंदिराच्या आत श्री. प्रभू रामा ची मूर्ती. व खाली गाभाऱ्यात महादेवाची पिंड असून सतत वाहणाऱ्या पाण्याचा कुंड आहे. मंदिर परिसरात संत गोमाजी महाराजांची पालखी,पादुका आहेत. 15-20 मिनिटात दर्शन करून आम्ही सर्वजण मंदिराबाहेर पडलो. मंदिराच्या आवारात  बरीच दुकाने आहेत. तिथे काहींनी थोडीफार खरेदी केली. सुनंदा भगत, रोहिणी गोळे व सुनंदा रनवरे यांच्या सोबत मीही मागेच राहिलो.
घाईत आम्ही गेटवर ऑटो जवळ आलो. तेव्हा सगळे तहाणलेलो होतो म्हणून सर्वजण उसाचा रस प्यायलो नी पुढच्या मंदिरा कडे निघालो.
पुढे आम्ही महाराज अग्नीत बसलेल्या गादी स्थळ पाहिलं. एका ठिकाणी उधळलेला घोडा त्यानीं त्याच्या पायाशी निजून त्यास शांत केलं होतं ते स्थळ. कुठे त्यांनी त्यांच्या शिष्यास भयंकर आजारातून बरं केलं ते स्थळ. असे एकूण 5 स्थळ 4 वाजेपर्यंत पाहीली. आणि
श्री गजानन महाराज मंदिरात गेलो, रांग बरीच होती साधारण अर्धा तास आम्हाला दर्शनाला गेले. श्री. गजानन महाराज दर्शन करून प्रसन्न झालो. थोडा वेळ मंदिर जवळ निवांत कीर्तनात रमलो. प्रसाद लाडू घेतले, सोबत मंदिर परिसरातुन पुन्हा खरेदी केली. दिवस खूप छान गेला होता आणि प्रवासात सोबत घेतलेला खाऊ  संपवला होता. त्यामुळे कुणालाही रात्री भूक नव्हती. फक्त एका काकीला डायबीटिज त्रास असल्यामुळे आम्ही तिघे जेवायला गेलो. साधं जेवण करून आल्यावर सर्वांना दुसऱ्या दिवसात कुठे जायचं, कधी जायचं यांच प्लॅनिंग करायला एकत्र जमवलं.
सर्वांनुंमते आजच्या सारखं गाडी बद्दल मी चौकशी करून 'लोणार सरोवर व सिंदखेड या स्थळांना भेट द्यायचे ठरवलं.
सकाळी सर्वजणी चहा, नास्ता करून कार साठी माझी वाट पाहत होते.
मी पुढे लवकर जाऊन गेट वर कांहीशी विचारपूस करून कार गाडी चा प्रवास दर अंदाजे समजून घेतला आणि सर्वांना परवडेल असा कार खर्च लक्षात घेऊन मोठी "क्रूझर कार " 14 सीटर बुक केली व आदल्या दिवशी आम्ही ' लोणार सरोवर " व सिंदखेड जिजाऊ जन्मस्थळ जायचं ठरवलं तसं फायनल केलं.
अंदाजे शेगाव ते लोणार, सिंदखेड 300 km अंतर रिटर्न होते. सर्वांना रात्री पुन्हा ट्रेन असल्यामुळे लवकर ट्रिप करून शेगाव स्टेशन ला यायचं होतं.
ठरल्या प्रमाणे सकाळी 9.30 वा.क्रूझर गाडी घेऊन संतोष पाटील ड्राइवर म्हणून स्वतः आले.


आम्ही झटपट नास्ता केला व प्रवासाला निघालो. साधारण 3 तास लागले आम्हाला " "लोणार सरोवर, उद्यान ला पोहचायला. भर उन्हात कडक दुपारी आम्ही 1 वा. जागेवर येऊन थांबलो. तिथे जवळपास खाण्या पिण्या साठी हॉटेल व्यवस्था नसल्याने खूप त्रास झाला. माझ्या सोबत सिनियर सिटीझन असल्यामुळे मला ही खूप वाईट वाटले. मी यांना त्रासात घेऊन आलो असे क्षणभर वाटले. तरी सर्वांनी थोडंसं चालत जाऊन, महादेवाचे पुरातन मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मी काही पुरातन मंदिरा शेजारी सर्वांना सोबत घेऊन फोटोशेषण केले. ते एका सपाट टेकडीवर उभं असं मंदिर असून समोरून खोल खाली जाणारा झरा दूर जगंलात जाऊन सरोवराला मिळतो. हे एक आश्चर्य आहे.  सर्वांना दुरवर जंगलात घेऊन जाणे शक्य नसल्याने काही जणी गाडीतच जाऊन बसल्या. तिथे शेजारी असणाऱ्यां काही फ्रुट्स सलाड वाल्याकडून सर्वांनी रु.40/ फ्रुट्स प्लेट. घेऊन खाल्ले.
माझ्या सासूबाई ,व सुनंदा रनावरे काकी, गोळे काकी या एकत्र काही अंतर टेकडी उतरून दुसऱ्या एका प्राचीन देवसूदन  मंदिरात दर्शन घेऊन कशाबशा वर येऊन थांबल्या. मला मात्र प्रचंड दूर जंगलात जाऊन त्या ऐतिहासिक "लोणार सरोवर " जवळून पाहायचं होतं.
मी जाताना खूप वेगाने पाय टाकत गेलो. मध्ये एका ठिकाणी प्रवेश फी रु 30/  द्यावी लागते. तिथे पोलीस कर्मचारी असतात.  खोल आत पायवाटातून रस्ता शोधत मी एका रिसोड च्या मुलांना जॉईन झालो व दूर असणाऱ्यां त्या सरोवरा पर्यंत पोहोचलो. ती सर्व मुलं तरुण होती. छान गप्पा मारत आम्ही चारजण कधी सरोवरा पर्यंत पोहोचलो कळालेच नाही.
लोणार सरोवर हे एकमेव पृथ्वी वरील उल्का पडून तयार झालेलं सरोवर आहे. खास करुन त्याचे पाणी खारं असल्यामुळे. ते  निसर्गाचा चमत्कार आहे. बरेच पर्यटक, इतिहाकार, संशोधक याची माहिती व फोटो घेण्यासाठी येतात.  सरोवर चंद्रा प्रमाणे लांबून दिसते.
तसेच सरोवराला लागून कमळजा देवीचे मंदिर देखील आहे. भाविक श्रद्धेने दर्शनाला जात असतात.तिथे दर वर्षाला यात्रा मोठया उत्साहात भरते.


सरोवर उद्यानात जाताना वेळेचे बंधन आहे. रात्री चे जंगलात वाघ, बिबटे, अस्वल,साप, इत्यादी प्राणी, पक्षी आढळतात.
वृद्ध किंवा आजारी व्यक्ती ने शक्यतो हा ऍडव्हेंचर प्रवास टाळावा.  त्रासदायक आहे शिवाय जिवावर ही बेतू शकतो.
मी सरोवर शेजारी पोहोचलो नी तितक्यात मोबाईलला रेंज आल्यामुळे माझा फोन वाजला. मला कळालेच नाही की मी 40 मिनिट चालत आत खोल जंगलात लोणार सरोवरा पाशी पोहोचलो. फोन घेताच सर्वांना मी कुठे आहेस याची काळजी सोबत लवकर गाडी जवळ ये म्हणून सर्व सांगत होते. खूप कंटाळा आला होता सर्वांना गाडीत बसून आणि पुन्हा रात्री च्या गाडीच टेन्शन.  मी त्यांना लगेचच येतो म्हटलं नी रिसोडच्या मित्रांना जोरात पावलं टाकत घेऊन निघालो. त्यानाही कुठे मित्राच्या लग्नाला जायचं होतं. आम्ही सर्व चोघेजन यावेळी जास्त वेगाने परतीच्या वाटेला निघालो. तहान लागली होती पाणी पिण्याची सोय नव्हती की कुणाकडे बाटलीही नव्हती. थापा टाकत आम्ही काही जवळच्या अंतरावर आलो आणि पाहतो तर काय एक महिला चक्कर येऊन पडली होती. तिच्या सोबत सर्व महिलां असल्यामुळे त्या सर्व घाबरून गेल्या होत्या. त्यांनी आम्हाला मदत मागितली. तेव्हा आम्ही सर्वांनी इकडे तिकडे कुणाकडून पाणी मिळतं का पाहून त्या मावशीला थोडं शांत, स्थिर होई पर्यंत हवा खालून पाणी पाजले व थोडंसं पाण्यात 2 बिस्किटे भरवली. त्या महिलेस वरपर्यंत आणणेसाठी आम्ही चौघांनी दोन हात दोन पाय धरून कसे बसे प्रयत्न केले. काही वेळाने त्या दोघांच्या खांद्यावर भार देऊन चालू लागल्या. तेव्हा त्या रिसोड च्या मित्रानी मला दादा तुम्ही जा आम्ही या मावशीला सोडतो असे म्हटले. मला ही त्या मावशी ला मदत करून आपण उपयोगी पडलो याचे समाधान वाटले. पुन्हा फोन वाजला आणि मी धावतच  गाडीकडे निघालो. धापा टाकत आल्यामुळे मला ही चक्कर येते की काय असे वाटतं होतं. गाडी जवळ येताच मला सर्व काकीनी पाणी दिले व शांत बसून आरामात फ्रुटस सलाड खा असे ठणकावून सांगितले. मला उशीर झाल्यामुळे मी सर्वांची माफी मागितली. व झालेला किस्सा सांगितला. तेही सर्व घाबरले व मनातून आपण न गेल्यामुळे आनंदित झाले.
असो नंतर काही वेळातच म्हणजे दुपारी 3 च्या सुमारास आम्ही सिंदखेडा कॅन्सल करून पुन्हा शेगाव ला निघालो. संध्याकाळी 7 च्या दरम्यान पोहोचन्यासाठी सर्व घाई करत होत्या.तसेच संतोष पाटील ड्राइव्हर ने ही वेळेत सोडतो सांगून गाडी परतीच्या दिशेने सुसाट चालू केली.
साधारण 6 च्या आसपास आम्ही सर्व शेगाव रेल्वे स्टेशन मध्ये पोहोचलो आणि गंमतच झाली. नेमकी आमची ट्रेन 3 तास उशिरा आहे असे समजले. मग मात्र सर्व पुन्हा कंटाळले.
तो पर्यंत मी व स्नेहल ने जाऊन जेवण पार्सल आणायचे ठरवले. सोबतच सर्वांना शेगाव कचोरी ही घेण्यासाठी फेमस "शर्मा शेगाव कचोरी " दुकानात जाऊन घेतली. मी त्या दुकानात गरमागरम खाल्ली व एक सेल्फी फोटो काडुन माझा स्टेटस ही ठेवला.


बघता बघता 9.50  ट्रेन येण्याची वेळ झाली.
सर्वजण पटापट पुन्हा आमच्या S4/S3 बोगीत चढलो. आता आम्हाला सर्व सीट व्यवस्थित व डबा जवळ असल्यामुळे बरं झालं होतं. सगळ्यांनी दोरुगडे काकीच्या जागेवर बसून एकत्र जेवण केलं नी 10.30 नंतर आराम करायला आपापल्या जागेवर गेले. सकाळी गाडी कल्याण स्टेशन ला 6.30 ला येणार होती. म्हणून कुणी कल्याण ला तर कुणी ठाणे स्टेशन ला उतरले. मी व माझ्या सासूबाई सोबत रनवरे काकी कुर्ला स्टेशन ला उतरलो.
सर्व आनंदात यशस्वी ट्रिप करुन आपल्या घरी सुखरूप पोहोचल्या याच मला माझंच कौतुक वाटलं.
तसं
मला माझे आयुष्य मनसोक्त जगायला आवडते.
तसंच
तुम्हालाही मनासारखे आयुष्य जगायचे असेल तर आपल्या सोबत अशीच हौशी,

 आनंदी माणसं जोडा व 3 महिन्यातुन एकदा का होईना नक्की पिकनिक प्लॅन करा
व मनसोक्त आनंद मिळवायला  शिका


 ❤❤.
गण गण गणात बोते. जय गजानन ????


श्री.लव गणपत क्षीरसागर
विक्रोळी, मुंबई.
मोबाईल : 9867700094

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू