पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

हुताशनी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

|| या अभंगात जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांनी दोषांच्या होळी विषयी सांगितले आहे. ||

 

दैन्य दुःख आम्हां न येती जवळी ।  दहन हे होळी होती दोष ॥१॥

आमचे दोषांची होळी होते, जसे “ हरि उच्चारणी अनंत पापराशी | जातील लयासी क्षणमात्रे” आणि म्हणून दैन्य आणि दुःख आमच्या जवळ येत नाहीत.

 

सर्व सुखे येती माने लोटांगणी । कोण यांसी आणी दृष्टीपुढे ॥२॥

सर्व सुखे स्वतःहून आमच्या जवळ लोटांगण घालतात, पण आम्ही त्यात बद्ध होत नाहीत.

 

आमुची आवडी संतसमागम । आणीक त्या नाम विठोबाचे॥३॥

आम्हाला दोनच गोष्टी आवडतात, एक तर संतांचा सहवास आणि विठोबाचे नामस्मरण.

 

 आमुचे मागणे मागो त्याची सेवा । मोक्षाची निर्देवा कोण चाड॥४॥

आम्हाला मोक्ष नको, तर विठोबाची सेवा आम्ही मागतो.

 

तुका म्हणे पोटी सांठविला देव । न्यून तो भाव कोण आम्हां॥५॥

आम्ही पोटात देव साठविला आहे, त्यामुळे आम्हाला न्यूनगंड नाही.

 

सर्वांना हुताशनी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

माऊली की जय जय श्रीकृष्ण!!!

 ह.भ.प. डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू