पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

रामाचे अभंग

विषय.. राम नाम अभंग


         "राम नाम स्मरण"

         

जप माळ हाती lराम नाम मुखी

आहे तोच सुखी l  घरी दारी...............१


गेला जर क्षण lपुन्हा नाही येणे 

राम नाम घेणे l जीवनात .................२


अंतकरणानी l देव आठवावा

जनात पहावा l प्रत्येकानी ................३


तुझेच स्मरण l नित्य हे असावे 

मन वळवावे l  प्रेमभावे ...................४


माझिया नौके ला lकर तीरी पार 

करूनी उध्दार l रामराया................५


पुंडरिकाक्षाय l घेते तुझे नाव 

अंतरीचे  भाव  l जाणुनिया............६


सौ. रेखा अडसुळे

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू