पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मनोज्ञा - विषयी

मनोज्ञा - विषयी

शाॅपिजेननं प्रकाशित केलाय, रसिकजनांच्या मनाचा ठाव घेणारा काव्यसंग्रह "मनोज्ञा."


तुमचं वय कितीही असू द्या, या कविता तुमच्या समोर तुमच्या "जीवनातील वसंत" उभा करतील, हे नक्की!


हा काव्यसंग्रह बुद्धीच्या समीक्षेचा भूकेला नाही, तर त्याला तुमची मनमुराद दाद हवीये. रसिकांच्या आनंदासाठीच तर या कवितांच्या कलिका संग्रहरूपात प्रकाशित केल्या आहेत.


आहात ना तयार स्वागताला? "मनोज्ञा" येतेय, तुमच्या तरल आणि तरुण मनाचा ठाव घ्यायला!


आठवांचं मोरपीस, घनगर्द आभाळ, मनाला पक्षी होण्याची आस, समेवर आलेल्या श्रावणधारा, कधी व्यक्त तर कधी अव्यक्त असा अनुराग अशा कितीतरी लोभस भावनांचं चांदणं प्रकट करणारी या "हास-या चंद्राची" स्नेहल "मनोज्ञा" वाचायलाच हवी!


- मानसी, मनोज्ञाची संपादिका

https://shopizen.app.link/vLj4Mr8Gyyb

 
 
 
 
 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू