पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

जिलबी

जिलबी...
किती गोड नाव आहे नाही.

नाव घेताच, तोंडाला पाणी न सुटले तेच नवल.
गोल गोल.... गोड गोड....

पाकाने रसरसलेली . गोडाव्याने भरलेली...

कुठे लाल कुठे पिवळी... रंगही तिचा हवा हवासा वाटणारा....

लहानपणी आम्ही आमच्या मामाच्या गावाला जायचो.... 

तिथली लाल जिलबी खूपच प्रसिद्ध होती...
बस मधून उतरल्या उतरल्या बस स्थानकाच्या बाहेर येताच दिसायची ती जिलबी....

रस्त्याने जाताना पाहिले दर्शन व्हायचे ते त्या लाल जीलबीचे...

सगळ्या छोट्या मोठ्या हॉटेल च्या पुढे येका मोठ्या ताटात, लाल लाल जिलबी व्यवस्थित रचून ठेवलेली असायची.....

सगळ्यांचे लक्ष तिच्याकडे पहिले जायचे.....

अशी ही रसरशीत जिलबी विनीत च्या जीवनात आनंद घेऊन आली.......

रोजच्या सारखाच विनीत आज ऑफिसमधून थोडा उशिराच घरी निघाला. गाडी खराब झाल्याने, तो पाईच घरी निघाला. ऑफिस ते घर तीन किलो मिटर चे अंतर असावे. त्याला वाटले आटोत कोंबून जाण्यपेक्षा आज पाईचं निघू या. बाजार चा पण फेर फटका होईल. थोडा वेळ ही जाईल. काही थोड्या छोट्या मोठ्या वस्तू खरेदी करायच्या होत्या ते काम पण होऊन जाईल.

तो रमत गमत बस स्टँड पुढून जात होता....

रोज तीच ती तशीच दिसणारी जिलबी दिसत होती.  तीचा आता त्याला  कंटाळा वाटायला लागली होता.....

मधे रामजी हॉटेल च्या पुढे येताच त्याला काय वाटले कुणास ठाऊक तो सरळ हॉटेल मधे घुसला. आणि मिठाई चे अवलोकन करायला लागला. एक खूप सुंदर नाही पण तरीही छानच वाटावी अशी मुलगी जिलबी खरेदी करत होती. तिने चार किलो ची ऑर्डर दिली होती. ...

विनीत तीच्याकडे बघायला लागला. इतकी जिलबी ही काय करणार. सहजच त्याला प्रश्न पडला. मग त्यानेच मनाशी विचार केला. असेल काही कार्यक्रम असेल , किव्वा फॅमिली खूप मोठी असेल....

तिची ती खरेदी बघून विनीत ला पण जिलबी घ्यायचा मोह झाला त्याने ऐक पाव ची ऑर्डर दिली आणि वाट बघायला लागला.

मालक जिलबी मोजण्यात बिझी झाला.
पण संपूर्ण जिलबी साडे तीन कीलोच भरली. मालकाने त्या मुली कडे बघून सांगायला सुरुवात केली. मॅडम साडे तीन किलो च भरत आहे. अर्धा किलो कमी आहे. तुम्हाला चालेल का.

त्यावर ती म्हणाली हो का, चालेल ना. नंतर ती विनीत कडे पाहून मालकाला म्हणाली, यांना पण एक पाव हवी आहे ना. यांच्या साठी ची पण काढून घ्या आणि बाकी सर्व मला दिली तरी चालेल.

त्यावर विनीत बोलला. मला नाही मिळाली तरी चालेल. माझी काही हरकत नाही.
तुम्ही यांची ऑर्डर पूर्ण करा , मी दुसरे काही तरी घेईल. 

पण ती मुलगी काहीच ऐकायला तयार नव्हती. तिने विनीत साठी एक पाव चे पॅक तयार करून घेतले. आणि उरलेले स्वतःसाठी पॅक करवून घेतले.

विनीत तिच्या त्या तशा वागण्यावर खूप खुश झाला. त्याला तिचा तो दुसऱ्यांचा पण विचार करणारा स्वभाव आवडला. 

त्याने सहजच तिचे थँक यू म्हणून आभार मानले.
त्यावर तिने पण विनीत ला वेलकम म्हणून प्रतिसाद दिला.

मग सहजच विनीत ला तिच्याशी अजून बोलवे वाटले. त्याने प्रश्न केला. इतकी जिलबी नेतात काही कार्यक्रम असणार तुमच्याकडे.  त्यावर ती बोलली नाही हो माझ्या कडे काही कार्यक्रम नाही. पण आज सहजच माझ्या मनात आले की. मी रोज ऑफिस सुटल्यावर घरी जाताना ऐक वृध्दाश्रम लागतो, मला त्याचे पुढून जाताना रोज वाटते की या इथल्या लोकांच्या चेहऱ्यावर नैराश्याचा आलेख दिसतो तो काही क्षणासाठी का होईना आनंदात बदलावा. म्हणून मी आज तिथे ही जिलबी घेऊन जाणार आहे.
तेवढंच त्या तिथल्या वृद्ध लोकांना बरे वाटेल.
विनितला तिचा हा एक अजून नवीन पैलू कळला. 

तिची ती वृद्धाबद्दलची भावना कळकळ बघून विनीतला तिच्या बद्दल सगळं जाणून घ्यायची ओढ लागली.

आता दोघांचेही पॅक रेडी झाले होते. दोघांनीही काउंटर ला पेमेंट केले आणि बाहेर आले.

विनीत ने मग मुद्दामच तिला विचारले, वृद्धश्रमात तुमच्या सोबत मी आलो तर तुम्हाला चालेल का.?

ती त्यावर थोडी हसली आणि बोलली वॉ का नाही, तुमची इच्छा असेल तर नक्की चला.
विनितल तिचे उत्तर ऐकून खूप छान वाटले.
आता दोघेही वृध्दाश्रम कडे सोबत सोबतच निघाले.

विनीत ने मग तिला आपली ओळख करून दिली. मी विनीत , विनीत देशमुख इथे बांधकाम विभाग कार्यालयात इंजिनीयर आहे. जवळच राम नगर ला राहतो. घरी आम्ही तिघेच आहोत,  आई आणि बाबा आणि मी. बाबा रिटायर्ड झालेत. ते आता घरीच असतात. 

मग त्याने तिच्याकडे बघितले.....

मग तिनेही स्वतःची ओळख करून दिली.
मी शुभदा, शुभदा कदम. मी पाटबंधारे खात्यात काम करते. इंजिनीयर आहे. घरी दादा, वाहिनी, आई असते. बाबांना जाऊन आता चार वर्ष झालीत. , मी साई नगरला राहते. साई नगर तुमच्या राम नगर च्या बाजूलाच आहे.

आता दोघेही वृद्धाश्रमात पोचले होते.
वृद्धश्रमत पोचतच सगळे वृद्ध शुभदा आली शुभदा आली करत तिच्या भोवती जमा झाले.
कशी आहेस ग शुभदा एक काकांनी तिला विचारले. 

ती म्हणाली काका मी छान आहे. आज मला सहजच इच्छा झाली की आपल्या सगळ्यांचे तोंड गोड करावे म्हणून मी आज जिलबी घेऊन आली बघा.

मग तिने आणलेले पार्सल काढले , कागदाच्या प्लेट्स काढल्या. आणि सगळ्यांना प्लेट्स दिल्या.

विनीत ने पण त्याचे पार्सल त्यात मिक्स केले.

वृद्धाश्रमाचे सगळे वृद्ध खुश झाले होते. त्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

सगळ्यांचा निरोप घेऊन विनीत आणि शुभदा घराकडे निघाले.

विनितला शुभदा खूप आवडली होती. 
पण शुभदाला आपल्या बद्दल काय वाटते. याचा त्याला अंदाज येत नव्हता.

विनितने मग सरळच शुभदा ला प्रश्न केला. तुम्ही लग्नाबद्दल अजून विचार नाही केला का ?

शुभदा त्या प्रश्नाने थोडी भांबावली. पण तिने स्वतः ला सावरत उत्तर दिले. 

हो मी अजून तो विचारच केला नाही. पण लग्न तर करायचेच आहे. कुणी चांगला मुलगा मला समजून घेणारा मिळाला तर नक्कीच तो विचार करेल.

मग तिने विनितला लग्ना बद्दल विचारले.
तर विनीत म्हणाला, मी मुलगी शोधतोय, पण आज अस वाटतय की मी जिला शोधतोय ती आता नक्कीच मला मिळाली आहे. 

मला अगदी तुमच्या सारखीच मुलगी माझी पत्नी म्हणून मिळाली तर खूप आनंद होईल.

त्या उत्तराने शुभदाचा चेहरा खुलला होता. 

चला घर जवळ यत आहे. मी तुम्हाला सोडून मग घरी जातो म्हणून तो तिच्या सोबत तिच्या घराकडे निघाला. 

शुभदा पण त्याची सोबत आवडली. तीही त्याचे सोबत सोबत घराकडे वळली.

संजय रोंघे
नागपूर,
मोबाईल -8380074730


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू