पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

जुने पाश

 जुने पाश ते सोडून

नवे मार्ग जोपासावे

मन जेथेही नेईल

तेथे फिरून की यावे...


नको जून्या आठवणी

करू नवी साठवण

नवे आकाश बोलावी

देऊ साद आनंदून...


ओल नको नेत्रांजनी

हास्य ओठावर यावे

फुलासम फुलुनही

कोमजने हे नसावे...


मीही मोडली बंधने

उंच भरारी घेईन

मुक्त भावना मनाच्या

आता त्यांना गोंजारिन...


वाट चोखंदळ माझी

व्हावा प्रवास सुखाचा

नको लवलेश आता

कणभर ह्या दुःखाचा...


सौ.अलका माईणकर

अकोला

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू